Headlines

एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास काय घ्याल दक्षता ?

 मारापूर परिसर सतर्क भाग घोषित जिल्हाधिकारी शंभरकर यांची घोषणा

सोलापूर -: जिल्ह्यातील मारापूर ता. मंगळवेढा येथील पक्षी बर्ड फ्लू सदृश रोगाने मरण पावल्याने हा परिसर नियंत्रित क्षेत्र तर मारापूर लगतच्या 10 किलोमीटर परिसर सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित  केला  आहे.

कार्यक्षेत्रात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. संबंधित तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने सर्व कुक्कुट फार्म, परसातील कुक्कुट पक्षांची तपासणी करावी. पक्षी मृत झाल्यास नियंत्रण कक्षाला (9822809064, 9527769179) माहिती द्यावी. कुक्कुट पालकांनी पक्षी मृत अथवा आजारी असल्यास तालुका पशुसंवर्धन अधिकारी (7083175999, 9049394733) संपर्क करावा.

 काय घ्याल दक्षता-       

एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्षांच्या संपर्कात अन्य पक्षी किंवा प्राणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

·         आजारी पक्षाची वाहतूक किंवा विक्री करू नये.

·         सतर्क क्षेत्रात जीवंत किंवा मृत पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आणि उपकरणे यांची वाहतूक करू नये.

·         सतर्क क्षेत्रात 5 किलोमीटर परिसरात पक्षांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्रीची दुकाने, वाहतूक बंद राहील.

·         सतर्क क्षेत्रातील पक्षी खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही बाजारात नेता येणार नाही.

·         आवश्यकतेनुसार मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *