Headlines

एक मराठा लाख मराठा चा नारा दिल्लीत घुमला

पंतप्रधान व राष्ट्रपती यांना आरक्षणासाठी निवेदन ,कोरोनाचे नियम पाळुन आंदोलन संपन्न

दिल्ली : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर  मराठा समाज आक्रमक झाला असुन मराठा समाज थेट दिल्लीत पोहचला असुन आज दिल्लीतील जंतर मंतर मैदान याठिकाणी मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदने देण्यात आली. कोव्हीडमूळे फक्त पाच सहा जणांचा आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती.यावेळी एक मराठा लाख मराठाचा नारा दिल्लीत घुमला. राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतिने हे आंदोलन करण्यात आले.

संपुर्ण देशाला आंदोलन कसे असते याची जाणुव करुन देत, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. यानंतर आरक्षण भेटले होते. याचा मराठा समाजाला मोठा फायदा होत होता. परंतु आता या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे परत मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता थेट मराठे दिल्लीत दाखल झाले असुन आज जंतर मंतर येथे राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना देण्यात आले. यावेळी आंदोलक कर्त्यांनी एक मराठा लाख मराठा असा नारा देत जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *