Headlines

एका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यशात्र विषयात Ph.D करण्यासाठी NET-JRF शिष्यवृत्ती साठी निवड

बीड – युजीसी आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय तर्फे असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप साठी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेमध्ये अंबाजोगाई येथील शहेबाज म. फारुक मनियार हे “राज्यशास्त्र” या विषयात ज्युनियर रिसर्च फेलोशीप ( NET-JRF)साठी नॅशनल फेलोशिप फॉर ओ.बी.सी.( सामाजिक न्याय मंत्रालय ) द्वारे पात्र ठरले आहेत. त्यांना Ph.D करण्यासाठी आणि संशोधन कार्य करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे पुढील पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.शहेबाज मनियार हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालय व महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी आहेत. त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली असून  पुण्यातील आझम कॅम्पस मधून “राज्यशास्त्र” या विषयातून M.A पूर्ण केले आहे. सध्या ते मुंबईत UPSC ची तयारी करत आहेत.

२०१९ मध्ये युवक काँग्रेसच्या “मैं भी नायक, सी.एम फॉर अ डे” या मोहीमेअंतगर्त शहेबाज मनियार यांची एक दिवसासाठी छत्तीसगडचे  मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.नॅशनल फेलोशिप फॉर ओ.बी.सी शिष्यवृत्ती विश्‍वविद्यालय अनुदान आयोग (UGC)तर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे.ज्यासाठी  केंद्रिय सामाजिक न्याय  मंत्रालय द्वारे आर्थिक मदत दिली जाते .जुन २०१९ मध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप शिष्यवृत्ती साठी नेट परीक्षा  घेण्यात आली होती. जे. आर.अफ. साठी आज  निकाल लागला असून शहेबाज मनियार यांना नॅशनल फेलोशिप फॉर ओ.बी.सी द्वारे राज्यशास्त्रात संशोधन कार्य करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.स्वतःची जिद्द,परिश्र व तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर शहेबाज  मनियार यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यश बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *