Headlines

उंब्रज नरसिंह या गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीज या रोगाची 2 जनावरे आढळल्यामुळे एकच खळबळ


सिंदखेड राजा/बालाजी सोसे – उंब्रज नरसिंह तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या गावांमधील शेतकरी कारभारी नागरे यांचे दोन बैल बाधित निघाले .लम्पी स्कीन डिसीज या बिमारी ने एकच खळबळ उडून दिल्याने उंब्रज नरसिंह आणि गावाच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे .त्यामुळे पळसखेड चक्का येथे आज दिनांक २५/९/२०२० रोजी सकाळी दहा वाजता किनगाव राजा येथील कार्यरत असणारे अधिकारी डॉक्टर विनायक गाडेकर पशुवैद्यकीय अधिकारी दवाखाना किनगाव राजा व त्यांचे सहकारी डॉक्टर ठाकरे यांनी पळसखेड चक्का येथील परिसरामधील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना (म्हणजे बैल,  गाय ,म्हैस व इतर जनावर) लसी दिल्या आणि त्या बिमारी ची संपूर्ण माहिती दिली .आणि या बिमारी मुळे जनावराला होणारे त्रास आणि खबरदारीची कशी घ्यायची यावर सविस्तर शेतकऱ्यांशी चर्चा केली .आणि बुलढाणा लाईव्हला बोलताना त्यांनी सर्व शेतकऱ्याला आवाहन केले. काळजीपूर्वक जनावराला लस घ्या असे त्यांनी त्यावेळी सांगितले. आणि या लम्पी स्कीन डिसीज या रोगामुळे या उंब्रज नरसिंह या गावाचा परिसरामधील पाच किलोमीटर पर्यंत असणारे सर्व गावातील जनावराला लस देणार असल्याची माहिती त्यावेळी बुलढाणा लावला बोलताना सांगितले .त्या ठिकाणी उपस्थित असणारे शेतकरी बबन मखर, परमेश्वर पालवे, सुरेश जायभाये,रामेश्वर जायभाये , माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील जायभाये ,संदीप मुंडे आणि पांडुरंग सोसे या सर्व शेतकऱ्यांनी डॉक्टर साहेबांचे आभार मानले कोरोनाचा काळामध्ये जनावराची सुद्धा काळजी घेण्यासाठी बाहेर गावावरून येऊन संपूर्ण मार्गदर्शन केले आणि गावांमध्ये लस दिल्याबद्दल पळसखेड चक्का यांच्यावतीने त्यांचे जाहीर आभार  मान्यता आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *