Headlines

इंधन दरवाढी विराेधात माकपा ची निदर्शने

सोलापूर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलीटब्युरोच्यावतीने २९जून हा दिवस ‘देशव्यापी निषेध दिन’ पाळण्याची राष्ट्रीय हाक देण्यात आली. त्या अनुषंगानेच महाराष्ट्रासह सोलापुरात इंधन दरवाढी विरोधात शहरात विविध ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शाखांच्यामार्फत इंधन दरवाढ तातडीने मागे घ्या. हि प्रमुख मागणी घेऊन सोमवार २९जून रोजी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली व माकपचे जिल्हा सचिव अ‍ॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *