Headlines

आ.परिचारक व आ.आवताडे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव असा निधी उपलब्ध करून देणार -श्रीकांत गणपाटील

मंगळवेढा प्रतिनिधी – मरवडे गावातील विविध विकास कामांसाठी जिल्हयाचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याकडे निधी मागणीचा पाठपुरावा केला आहे, मरवडे गावासाठी आ.परिचारक यांच्या आमदार फंडातून मरवडे गावाला मोठा निधी मिळाल्याने रस्ते,स्पर्धा परिक्षा केंद्र, हायमास्ट दिवे उभारले आहेत. गावातील रखडलेली विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी आ.प्रशांत परिचारक,आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मरवडे गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे मत भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा मरवडे गावचे युवा नेते श्रीकांत गणपाटील यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले.


जिल्हयाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मरवडे-मासाळ वस्ती रस्ता वादग्रस्त होता. अखेर या रस्त्याला एक कोटी 56 लाख 84 हजार इतका भरीव असा निधी मिळाल्याने हे काम सुरू झाले आहे. युवा पुढीला योग्य मार्गदर्शन,भविष्य वाटचालीस दिशादर्शक म्हणून नव्याने उभारण्यात आलेल्या आभ्यासिका स्पर्धा परिक्षा केंंद्र, मरवडे येथे उभारले आहे. यासह जगताप-घुले वस्ती येथे हायमास्ट दिवा मंजूर असून, सदगुरू बैठक सुविधेसाठी रमेश गणपाटील यांच्या प्रांगणात हायमास्ट दिवा उभारलेला आहे. या विकास कामाबरोबर मरवडे येथील शेतकर्‍यांच्या विविध अडचणी,वीज कनेक्शन,नवीन डीपी बसविणे, जळालेला डीपी दुरूस्तीसाठी तात्काळ प्रयत्न आम्ही आ.परिचारक व आ.आवताडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत. अपेक्षा विरहीत,अखंडीतपणे सुरू ठेवलेल्या सामाजिक कार्यामुळे आज मरवडे ग्रामपंचायतीवर आपल्या विचाराची सत्ता आली. येथील सरपंच,सदस्य व आजी-माजी पदाधिकारी विकास कामाच्या प्रयत्नाला साथ देत आहेत, यामुळेच मरवडे गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी पदाधिकार्‍यांना समाधान मिळते, असा विश्वास श्रीकांत गणपाटील यांनी बोलताना व्यक्त केला.


गणपाटील पुढे म्हणाले, कोरोना महामारीत शैक्षणिक व्यवस्था कोलमडली आहे, तरीही प्रशासन दरबारी आपण मरवडे गावातील विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळावी, यासाठी प्राथमिक शाळा मुलींच्या 4 वर्ग इमारत बांधकामासाठी तात्काळ निधीची मागणी केली आहे. यासह शाळा वर्ग दुरूस्ती, पटांगण सुशोभिकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मरवडे गाव अंतर्गत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटार बांधकामास निधी, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी निधी, शेती उत्पादन वाढीसाठी दिगंबर गायकवाड, तुकाराम विठ्ठल कोलते, सोपान दाजी जाधव यांच्या शेती लगत असलेल्या ओढयावर सिमेंट बंधारे उभारणीसाठी निधी, तिर्थक्षेत्र क वर्ग दर्जामधून सिंहगड महाराज, गैबीसाहेब देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी निधी, आ.समाधान आवताडे यांच्या उपक्रमानुसार मरवडे गावास जोडण्यात आलेली रस्ते,पानंद रस्ते दुरूस्तीसाठी आम्ही निधी मागणीचा पाठपुरावा करीत आहोत. यासह वैयक्तिक लाभ,सार्वजनिक विकास कामे, आरोग्य सुविधा, प्रशासनाकडून मरवडे नागरीकांना मिळणार्‍या सुविधेसाठी मरवडे ग्रामपंचायत प्रशासन दक्षतापूर्ती आहे.


गावच्या विकास कामासाठी भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष म्हणून आम्ही गावासाठी निधी आण्यात कुठे कमी पडणार नाही, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कटीबध्द असल्याचे गणपाटील यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply