Headlines

आशा सेविका व आशा गट प्रवर्तकच्या मानधनात वाढ – रणसंग्रामच्या निवेदनाची घेतली दखल

रणसंग्राम फाऊंडेशन च्या लक्षवेधी निवेदनाची सरकारने घेतली दखल ; कुंडल येथील आशा सेविकांनी मानले अजितदादांचे आभार.

सांगली – जेष्ठ समाजसेविका अँड. मनिषा रोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कुंडल ता. पलुस येथील रणसंग्राम फाऊंडेशन तसेच ज्ञानदर्शन वार्ता व्दारा राज्यभरातील आशा सेविका यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 7 वा वेतन आयोगानुसार मानधन मिळणेबाबत लक्षवेधी निवेदन ई मेल व्दारा पाठविण्यात आले. या लक्षवेधी निवेदनाचा पाठपुरावा राज्यभरातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध संघटनांनी करत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन मागण्यांचे गा-हाणे दिले होते. या निवेदनाची दखल घेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा कर्मचारी यांना 2000  व आशा गतप्रवतक  याना 3000 रुपय मानधन वाढ देण्यात आली.या निर्णयानंतर कुंडल येथे अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांनी साखर वाटत आनंद साजरा केला.

रणसंग्राम फाऊंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे की,  जगभरात आणि देशात, आपल्या महाराष्ट्राला कोरोनाच्या महामारीचा प्रचंड मोठा विळखा बसला आहे. सरकारने दिलेल्या सर्व प्रशासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रशासनाचे मुख्य घटक पोलीस दल आणि आरोग्य प्रशासन, सामान्य प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना पार्श्वभमीवर अहोरात्र राबणा-या आपल्या या प्रशासकीय यंत्रणांतील पोलीस आणि आरोग्य सेवकांना सुरक्षा कवच म्हणुन 25 ते 50 लाखांची विमा सुरक्षा आपण देवुन या कोव्हीड योध्दयांचे मनोधैर्य वाढवले मात्र कोव्हीड योध्दा म्हणुन ज्यांचा सन्मान आपण केलात त्या आशावर्कर आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणुन सेवा बजावणा-या महिला सेवकांना प्रशासकीय सेवा सुविधांची अपेक्षा आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्तव्य बजावणा-या या रणरागिणीं आशासेविकांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या लाजीरवाण्या घटना घडून गेल्या. प्राणघातक हल्ले, कुटूंबाचा विरोध आणि समाजातील विविध घटकांकडून मिळणारी लज्जास्पद- अपमानास्पद वागणुक या सर्वांना फाट्यावर मारून या सावित्रीच्या लेकी कोरोना विरोधी लढ्यात युध्दपातळीवर कर्तव्य बजावत आहेत., आणि आपल्या सरकारकडून या लढवैय्या रणरागिणींची उपेक्षा होत असुन या सर्व महिलां न्याय मागण्यांच्या प्रतिक्षेत आहेत. लक्षवेधी निवेदनाव्दारे … कोरोनाच्या लढाईत जीव तळहातावर घेऊन तुटपुंज्या मानधनात राबणा-या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना कोव्हीड योध्दा अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या 7 व्या वेतन आयोगाच्या सेवा शर्तीने मानधन तथा पगारवाढ मिळणेबाबत आपणांस मागणी करण्यात येत आहे. आपण आणि आपणच या लक्षवेधी मागण्यांना न्याय द्यावा. या निवेदनाची दखल घेऊन सरकारने आशासेविकांच्या आयुष्यात नवचेतना दिली असल्याचे मत महिला वर्गातून व्यक्त होत आहे.

रणसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक लाड म्हणाले, जेष्ठ समाजसेविका अँड. मनिषा रोटे (माई) यांच्या कुशल मार्गदर्शनासाठी तसेच
ज्ञानदर्शन वार्ता चे संपादक दत्ताभाऊ पाटील, शिवाजी रावळ यांच्या सहकार्याने राज्यभरातील आशा सेविका – गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका – मदतनीसांच्या सर्व संघटना यांना सोबत घेऊन आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने ही चळवळ सक्षमपणे उभा करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *