Headlines

आदिवासी युवा संघटना करणार कोविड (कोरोना) योद्ध्यांचा शाही सन्मान

 प्रतिनिधी/स्वप्नील भोईर – 9 ऑगस्ट  जागतीक आदिवासी दिनाच्या नियोजना निमित्ताने ता.अध्यक्ष मा. नितीन भोईर साहेब यांच्या निवासस्थानी आदिवासी युवा संघटना पदाधिकारी, सदस्य तथा प्रमुख कार्यकर्ते यांची शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व नियमांचे पालन करून बैठक झाली.
 या बैठकीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सातत्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या वाडा तालुक्यातील पोलीस प्रशासन,नगरपंचायत मधील कर्मचारी,वाडा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, वाडा पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल,व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात येणार असा ठराव एकमुखाने पारित केला गेला . 
 येत्या 9 ऑगस्ट  जागतीक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमावेळी या सर्व कोविड योध्याना सन्मानित केले जाईल. सदर बैठकीला वाडा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.शेळके मॅडम,बौद्धाचार्य तथा गवंडी बांधकाम मजूर संघटना पदाधिकारी आयु.सुजय जाधव साहेब,नगराध्यक्षा सौ.कोळेकर मॅडम,महिला बालकल्याण सभापती सौ.काळण मॅडम,मा.जि.प.सदस्य श्री. राजू दळवी साहेब,मोज ग्रामपंचायत सरपंच श्री.संतोष मोरे साहेब व इतर 11 ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.सदर बैठकीत सभापती श्री.योगेश गवा साहेब,श्री.सुरेश पवार साहेब,श्री.संतोष बुकले साहेब,श्री. संजय भोईर साहेब या मान्यवरांनी कोरोना मुळे फोन कॉल द्वारे सहभाग घेतला.
   
बैठकीत 9 ऑ.जागतीक आदिवासी दिवस हा अतिशय साध्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन साजरा करायचा असे ठरले.यावेळी संघटनेने मागील 6 वर्षांपासून पुढे राहून काम केले असल्याने यावेळी देखील आदिवासी युवा संघटना  गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करेल असा ठराव पारित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *