Headlines

आदर्श सरपंच पुरस्कार खेड गावाचे सरपंच गणेश नामदेव धायगुडे यांना जाहीर

बिदाल प्रतिनिधी

खंडाळा तालुक्यातच नव्हे तर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गावचे युवा सरपंच कै. नामदेवराव धायगुडे यांचे चिरंजीव गणेश नामदेवराव धायगुडे यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यात नावलौकिक मिळवल्याबद्दल सरपंच गणेश धायगुडे यांची दखल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेतली गेली.सरपंचांच्या या कार्याबद्दल गौरव व्हावा म्हणून सरपंच सेवा संघाच्या वतीने गणेश धायगुडे यांना आदर्श सरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी एक वाजता कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संस्थापक सरचिटणीस बाळासाहेब पावसे, अध्यक्ष सरपंच भाऊ मरगळे यांनी दिली.या पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संस्थापक यादोराव पावसे हे असून या पुरस्काराचे वितरण सिनेअभिनेते माननीय सयाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री ना. दादासाहेब भुसे व केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे याच्या यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

बातमी

खेड बुद्रुक गावातील सर्व नागरिकांचे प्रेम व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य,सबंध तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन व आमदार मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन मला समाजोपयोगी कार्यात नेहमीच मोलाचे ठरते.

गणेश धायगुडे
सरपंच- खेड बुद्रुक

आमच्या गावचा कार्यतत्पर सरपंचांना या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे मनापासून आभार व्यक्त करते आम्हाला समाजोपयोगी कामे करण्यासाठी यामधून नक्कीच प्रेरणा भेटेल.

धनश्री रासकर-उपसरपंच -खेड बुद्रुक

Leave a Reply