Headlines

आजी-माजी सैनिकाकडून कु. ऋतुजा च्या उपचारासाठी तेवीस हजार पाचशे रुपयांची रोख मदत

प्रतिंनिधी – कुंडल येथील गरीब अशा रामोशी कुटुंबातील कु. ऋतुजा श्रीमंत मंडले,या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीला ब्लड कॅन्सर झाला असून सध्या तिच्यावर मिरज येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या गंभीर आजाराचा वैद्यकीय खर्च सुमारे पंधरा लाखाच्या आसपास असून या कुटुंबाला समाजातून सर्वतोपरी मदतीचे आवाहन गणेश मानुगडेसह अँड. दीपक लाड, मारुती शिरतोडे,शिवाजीराव रावळ, तानाजीराव मंडले आदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याने या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू लागली आहे.

कालच सांगली येथील सुभेदार मेजर लिंगलेसाहेब यांनी दहा हजारांची आर्थिक मदत केली .तर आज कुंडल मधील माजी सैनिक मेजर माणिक सावंत तसेच नामदेव आप्पा माळी विष्णू रावळ डँडी व इतर आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन मंडले कुटुंबास 23 हजार 500 रुपये आर्थिक मदत प्रत्यक्ष घरी जाऊन दिली.कुंडल येथिल भारतीय सेना दलातील आजी माजी सैनिक, माणिक सावत, संतोष जाधव, कृष्णत औटे,राहुल एडके, नामदेव माळी, डँडी रावळ, संदिप थोरबोले, रणजीत भोसले, आशिष माळी, सुरज लाड,रवी होवाळ,  अंकुश गडचे, महेश मदने, हिंमत माने यांनी पाटोळे कुटुंबास हातभार दिला. यावेळी रणसंग्राम सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. दिपक लाड,शिक्षक नेते मारुती शिरतोडे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रावळ, शिवसेनेचे संघटक शिवाजी पवार व इतर उपस्थित होते.या आजी-माजी सैनिकांनी केलेल्या मदतीबद्दल उपस्थितांनी त्यांचे  आभार व्यक्त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *