Headlines

अल्पसंख्यांक हक्क दिन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

महाराष्ट्रात सध्या कोरोना रोगाच्या निर्मूलनानंतर सर्व क्षेत्रे खुली होत असताना ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ मात्र ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेऊन अल्पसंख्यांकांचे हक्क व त्यांचे अधिकार डावलण्याचा प्रकार खुद्द अल्पसंख्यांक विकास विभागाकडूनच अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या दिवशीच करण्यात आला, याचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजात काम करणाऱ्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी आहे. लवकरात लवकर हा कार्यक्रम पुन्हा ऑफलाईन घेऊन अल्पसंख्यांक मागण्या पूर्ण कराव्यात. -मुस्लिम अधिकार आंदोलन महाराष्ट्र चे अध्यक्ष मुनीर मुल्ला

प्रतिंनिधी-सुहेल सय्यद-18 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगात अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो, हा दिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला गेला. महाराष्ट्रात मात्र कोरोनामुळे शासकीय पातळीवर हा दिवस ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेऊन साजरा करण्याचे आदेश अल्पसंख्यांक विकास विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून देण्यात आला; त्याप्रमाणे सांगली जिल्हा प्रशासनाकडूनही फक्त शासकीय आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने निव्वळ एक औपचारिकता म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्याच्या निषेधार्थ सोमवार, 21 डिसेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून अल्पसंख्यांक विकास विभागाचा जाहीर निषेध करण्यात आली.

या वेळी निदर्शने करून मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मा.अभिजित चौधरी यांना दिले, महाराष्ट्र मायनॉरिटी फोरम चे अध्यक्ष झाकीर शिकलगार, आयुब पटेल, तोहिद शेख, मुस्तफा बुजरूक, शकील भाई पिर्जादे, अॅड. काझी, असिफ इनामदार, शरीफ सय्यद, अब्दुल भाई मुल्ला, याकुब मणेर, सलीम पन्हालकर, तोफिक हवालदार, जेलाब शेख, समीर मुजावर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply