अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य सर्वांना समानच

 


कुठल्याही चैनलचा पत्रकार असो त्यांनी एखादी बातमी दिली ती फेक असली तर ते पत्रकार आणि त्या चॅनेल चे संपादक हे जबाबदार असतातच.


भारतातील सर्व नागरिक सर्वजण चैनल बघण्यासाठी पैसे भरतात आणि भारतातील सर्व नागरिकांना अधिकार आहे की कुठलेही चैनल चुकीची आणि भडकण्यासाठी बातमी देत असतील तर त्यावर त्वरित कारवाई करावी. तसेच सर्व नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा आहे की या बातमी बाबत अभिव्यक्त व्हावे.


पत्रकार आहे आणि चैनल एक नंबर आहे याचा अर्थ सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करणे नव्हे आणि सन्मान न ठेवणे हा होऊ शकत नाही.


अनेक न्यूज च्या अशा अनेक बातम्या चुकीच्या येत आहेत त्यामध्ये अर्णव गोस्वामी यांची आहेच. तसेच अनेक चैनल जाहिराती आणि टीआरपी साठी बातम्या देत आहे हे उघड आहे.


भारतातील प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार  संविधानाने दिलेला आहे कारण प्रत्येक नागरिक त्याचे पैसे त्यांना देतात आणि ते आपल्याला सेवा देतात आणि ते आपल्या सेवा योग्य देत नसतील तर प्रत्येक नागरिकाला त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे.


प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त पत्रकारांना नसून प्रत्येक नागरिकाला सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि तो प्रश्न पत्रकारांना आणि न्यूज चैनल ला सुद्धा विचारला जाऊ शकतो.


त्यांनी चुकीच्या बातम्या देऊन संविधान अनुच्छेद 21 जीवन जगण्याचा अधिकार आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार याचे उल्लंघन करत आहेत ते कसे तर अनेक बातमी दाखवत आहेत ती बातमी लोकांना भडकवणे, लोकांना गोंधळून टाकणारे, लोकांना घाबरवून सोडणारे यामुळे कुणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो. 


संविधान अनुच्छेद १९ नुसार अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य यामध्ये एवढे स्वातंत्र्य नाही की संविधानाचा दुसरा अनुच्छेद २१ सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार याला तडा बसेल हे संविधानाला मान्य नाही.


अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ लोकांना भडकवणे, लोकांना कन्फ्युजन करणे आणि चुकीच्या बातम्या देणे तसेच एकच बाजू मांडणे होऊ शकत नाही. 


अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ लोकांचा जीव घेणे किव्वा लोकांना एकाच बाजू दाखवून वश मध्ये करणे होऊ शकत नाही.


अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पत्रकार, व्ही आय पी नागरिक आणि सामान्य नागरिक यांच्या साठी वेगळे वेगळे होऊ शकत नाही. सन्माननीय न्यायालयाचा आदर राखून न्यायालयाने सुद्धा सर्वांना समान कायदा आहे तसे समान कार्याद्यात आणले पाहिजे आणि हे न्यायालय यांचे संविधानातील कर्तव्यच आहे.


तसेच हिंदु-मुस्लिम द्वेष, जाती-पाती द्वेष, पक्ष – पार्टी द्वेष अशा वेगळ्या बातम्या देऊन संविधानातील मूळतत्व धर्मनिरपेक्ष, एकत्व, एकात्मता, समानता, बंधुता, भाषा त्याचाही तडा जात आहे.हे संविधानाला मान्य नाही.


संविधान या मूलतत्व या वर घाव होत असेल तर भारतातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. हा अधिकार संविधानाने आपल्याला संविधानातील कर्तव्य या मध्ये दिलेला आहे.


खरंतर आता वेळ आली आहे की पत्रकारिता याच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करणे आणि संविधानातील चौथा खांब वाचवणे.


                                                                      मनीष देशपांडे – मानव हक्क कार्यकर्ते

टीप- लेखकांने व्यक्त केलेल्या मताशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नव्हे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *