अतिवृष्टी मध्ये पिकाचे नुकसान झाले असेल तर तात्काळ विमा कंपनीकडे दावा करण्याचे शिवार हेल्पलाइन चे आवाहन ७२ तासाच्या आत दावा करण्याची अट

rainforest during foggy day


उस्मानाबाद :- गेल्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सतत सुरू आहे. कोरोना च्या वेगवेगळ्या लाटा, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव न मिळणे, वाढलेले खते/बियाणे चे दर इत्यादी विषय बळीराजा मागे हात धुवून लागले आहेत. पेरणी झाली की पावसाने उघडीप दिली आणि अचानक उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

पाडोळी (आ.), सलगरा, ईटकळ, जळकोट, नळदुर्ग, परंडा, आसू, जवळा, अनाळा, सोनारी, उमरगा, डाळिंब, मुळज, लोहारा आणि माकणी या १५ मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यात जीवित व वित्तहानी पण झालेली आहे. पिकांचे व शेतीचे नुकसान झालेले आहे.


ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२१ चा पीक विमा भरला आहे व सध्या काल व परवाच्या पावसाने ज्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे त्यांनी भारत सरकारच्या “क्रॉप इन्शुरन्स” किंवा बजाज कंपनीच्या ” फार्ममित्र ” ॲप वर ७२ तासाच्या आत ऑनलाईन दावा करावा. किंवा १८००२०९५९५९
या टोल फ्री नंबर वर फोन करून कळवावे.


विम्याचा दावा करताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे संस्थापक श्री विनायक हेगाना यांनी केले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.


यासाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply