हेक्टरी एक लाख रुपये मदत करा – रयत क्रांती संघटना



माढा/राजकुमार माने – अतिवृष्टी व सीना माईला आलेल्या पुरामुळे सीना काठचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे.तसेच नदीकाठ जमिनी खचून वाहून गेल्यामुळे जमिनीचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. उसाच्या पिपाणीत गाळ जाऊन ऊस नष्ट झाला आहे.त्यामुळे उसाच्या पुन्हा लागणी कराव्या लागणार आहेत. फळबाग फळासाहित जमीनदोस्त झाल्या आहेत. विद्युत मोटारी, पाईप , केबल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे सीना काठच्या व सोलापूर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त भागातील पंचनामे त्वरीत करून तात्काळ हेक्टरी एक लाख रु नुकसान भरपाई मिळावी. ही विनंती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply