Headlines

हुलजंती येथील श्री महालिंगराया यात्रा रद्द पूर्वापार चालत आलेली परंपरा खंडित

प्रतिनिधी/अमीर आत्तार : सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिवाळी पाडव्याला हुलजंती येथे श्री महालिंगराया देवस्थनच्या वतीने भरवण्यात येणारी यात्रा व पालखी भेटीचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती देवस्थान कमिटी व श्री महालिंगराया यांचे वंशज श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रत्येक वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अमावस्येच्या रात्री श्री शंकर-पार्वती श्री महालिंगराया यांचा सन्मान म्हणून प्रत्यक्ष श्री महालिंगराया मंदिरास फेटा बांधून जातात यास कर्नाटकी भाषेत मुंडास या नावाने देखील ओळखले जाते. तसेच हे एक जागृत देवस्थान असून महाराष्ट्रा, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथे दक्षिण काशी म्हणून हुलजंती गावाला संबोधले जाते. या राज्यांमधून लाखो भाविकभक्त यात्रेस असतात.

गेल्या शेकडो वर्षापासून श्री बिरोबा, श्री महालिंगराया, अन्य सात पालख्यांचे भेटीचा सोहळा अमावस्येच्या पूर्व संध्येला मंदिरास ‘मुंडास’ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 च्या सुमारास पालखी भेटीचा सोहळा संपन्न होत असतो.

परंतु प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना महामारी असल्याकारणाने व कोरोनाचा संसर्ग वाढुनये या कारणाने खबरदारीचा उपाय म्हणून हुलजंती येथील यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आली असल्याची माहिती महालिंगराया ट्रस्ट कमिटी व श्री महालिंगराया चे वंशज श्रीकांत सोमूत्ते (वडियार) यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली. यामुळे भविकभक्तांनी यात्रेस व दर्शनास येऊनये असे आव्हान श्री महालिंगराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply