Headlines

हुलजंती येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढा – जनकल्याण फाउंडेशन

 हुलजंती/अमीर आत्तार –   मंगळवेढा तालुका येथील पश्चिम भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून हुलजंती ओळखले जाते. गेली 10 ते 12 वर्षे झाले गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी  यांनी आवा च्या सव्वा रक्कम घेऊन  हुलजंती गावठाण व येथील सरकारी जमिनी लोकांच्या नावाने बेकायदेशिरपणे नावे केले आहेत . गावातील तीस-चाळीस टक्के तरुण सुशिक्षित बेकार असून त्यांनी ग्रामपंचायत कडे व्यवसायासाठी जागेची मागणी करतात .परंतु ग्रामपंचायत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू उदरनिर्वाह करण्यासाठी जागा देत नाही  .विचारल्यास गावांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगतात . परंतु गावाबाहेरील नातेवाईक पाहुण यांना मात्र जागा उपलब्ध कशी होते . गावातील काही तरुण ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही जगा देत नसल्याकारणाने जन कल्याण फाउंडेशनच्या वतीने आज  रोजी ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन दिले.  यावेळी वेळी सोलापूर जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), ग्राहक मंच तालुका अध्यक्ष अमोल कोरे , युवा नेते मारुती पेटर्गे, हिम्मत पेटर्गे, सिद्धेश्वर पेटर्गे, सुनील सोमुत्ते, दशरथ पेटर्गे, आदी ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत हुलजंती यांना निवेदन आहे व सुशिक्षित बेकारांना न्याय मिळवून द्यावा असे आव्हान केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *