हुलजंती ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी 71 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल , प्रभाग तीन बिनविरोध..!


मंगळवेढा/अमीर आत्तार – :तालुक्यातील हुलजंती ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण 71 अर्ज दाखल झाले आहे. यामुळे निवडणूतिच्या रणधुमाळीला उधाण आले असून अत्ता पासूनच तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी या करिता गावातील काही प्रतिष्टीत मंडळींचा खटाटोप चालू होता,  अखेर त्या प्रयत्नाला अपयश आले आहे. परंतु हुलजंती ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन (3) ही बिनविरोध करण्यात माजी सरपंच गोविंद भोरकडे यांना यश आले.

सत्ताधारी गटाला आव्हान देण्यासाठी सर्व युवावर्गाच्या पुढाकारातून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा नेटाने प्रयत्न सुरु होता. जागावाटपाच्या फाॕर्म्युल्याची देखील वारंवार चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत होती. परंतु या वेगवेगळ्या असलेल्या आघाडीमध्ये असलेल्या प्रमुख तिन्ही गटांनी स्वतंत्र आस्तित्व सिद्ध करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात परस्परांवर कुरघोड्या करुन शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहे.

त्यामुळे प्रभाग तीन (3) सोडून इतर सर्व प्रभागात दुरंगी अथवा तिरंगी लढती होणार की काही प्रभागात बहुरंगी लढती होणार याचा अंतिम निकाल 4 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. एकंदरीत यामुळे आत्ता बिनविरोध निवडणूकीची शक्यता मावळी आहे.

Leave a Reply