Breaking News

हाथरस येथील पीडित मुलीच्या न्यायासाठी माजलगाव मध्ये निषेध आंदोलन

    
माजलगाव : आज माजलगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी हाथरस बलात्कार व अमानवी हत्या प्रकरणाच्या निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच हे प्रकरण दडपणाऱ्या युपीच्या भाजप सरकार व पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करण्यात आले.  हे आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड मुसद्दिक बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


अमानवीय दुर्घटनेचा आणि या प्रकरणात यूपी मुख्यमंत्री योगी व त्यांचे पोलीस प्रशासन आरोपींच्या बाजूने आणि पीडिता व पिडतेच्या कुटुंबाच्या विरोधात आहेत. आरोपींना पाठीशी घालण्यासाठी पीडित युवतीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देता परस्पर जाळून टाकणाऱ्या युपी पोलीस प्रशासनाच्या या मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचा तिव्र निषेध करण्यात आले  हे कृत्य मनुस्मृति आधारित पुरुषसत्ताक मानसिकतेतून केला जात आहे, भाजपच्या उत्तरप्रदेश सरकाराचा व मुख्यमंत्री योगी यांचा निषेध करण्यात आले व पिडीत मुलीला न्याय मिळाला पाहिजे आशी मागणी करण्यात आली.   

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  जिल्हा कमिटी सदस्य, ऍड. काॅ. सय्यद याकूब, कॉ.शिवाजी कुरे, एसएफआयराज्य कमिटी सदस्य, रुपेश चव्हाण,  काॅ. विनायक चव्हाण, वंचित बहुजन आघाडी चे अंकुश जाधव, आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यांच्यासह कॉ. मेहबूब शेख, सय्यद रफिक, सय्यद फारुख, राहुल मोताळे, विशाल इंगळे, मेहंदी, चिंतामनी चव्हाण, शेषराव आबुज, विठ्ठल सक्राते, एकनाथ सक्राते, मुस्तकिम बाबा, संदिप फंदे,  आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!