हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन साजरा

 

 सुहेल सय्यद/सांगली – हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन कवठे एकंद मध्ये साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनोर ला महाराष्ट्रातून 176 लोकांनी नोंदणी केली होती. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक क्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र समाजामध्ये याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावेत यासाठी जागतिक पातळीवर दरवर्षी 28 मे हा मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.

     कार्यक्रमच्या प्रमुख वक्त्या डॉ. दीपशिखा दिवाकर स्त्री रोग तज्ञ  मध्यप्रदेश ह्या होत्या. यांनी मासिक पाळी म्हणजे काय, तसेच मासिक पाळी मध्ये घ्यायची काळजी, PCOD, मोनोपोज, गर्भाशयाच्या गाठी तसेच आहार कसा असावा या विषयवार मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, जो पर्यंत आपण या विषयावर उघडपणे बोलणार नाही चर्चा करणार नाही तो पर्यंत समाजातील अंधश्रद्धा व अज्ञानपना हा दूर होणार नाही यासाठी युवकांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे.

      या कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिलांनी उपस्थिती दर्शवली या मध्ये कवठे एकंद च्या उपसरपंच सौ.शर्मिला घाईल, श्रीमती पी आर पाटील आय सी डी एस विभाग तासगाव, रितू पहानपटे आदिवासी विभाग चंद्रपूर, निशा पाटील समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना सांगली, सुनिता देशमुख, स्वाती टाकूडगे, मनीषा भोंगाळे उपस्थित होत्या.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे स्वयंसेवक अनिकेतन पवार व  आभार रमजान शेख यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्षा आरिफा मुजावर, उपाध्यक्षा शोभा माळी, अनुराधा पाटील, सामाजिक सल्लागार उर्मिला दशवंत संस्थेच्या सदस्या कीर्ती पवार, मुनेरा भालदार, प्रमोद माने, वासिम सय्यद यांनी केले  तांत्रिक सहाय्य सुहेल सय्यद यांनी केले

Leave a Reply