Headlines

हगलुर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

  


 उ. सोलापुर: 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बालविकास प्रकल्प उत्तर सोलापूर च्या वतीने आज दि. 10 मार्च रोजी हगलूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धा घेण्यात आल्या व मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. 


           सावित्रीबाई फुले व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमास पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.  या कार्यक्रमास उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे , माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, गट विकास अधिकारी डॉ. जास्मिन शेख, बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागने , हगलुर गावच्या नूतन महिला सरपंच अरिफा पठाण , माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी भडकुंबे , पोलीस कॉन्स्टेबल अर्चना मस्के , ब्रांच पोस्टमास्तर पूजा कांबळे , वर्षा पवार आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचे मार्गदर्शन झाले.


  एक स्त्रीचं चांगल कुटुंब ,चांगला समाज घडवू शकते. देशाचे चांगले नागरिक तिचं घडवू शकते या शब्दात सभापती रजनी भडकुंबे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 

    त्यानंतर गट विकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख म्हणाल्या की, महिलांमध्ये अनेक क्षमता असतात त्याला फक्त ओळखून या महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम सर्वांनी मिळून करायला पाहिजे. स्त्रियांनी आपलं आणि आपल्या कुटुंबच आरोग्य सांभाळलं पाहिजे.  

    शिक्षणाचे व बचतीचे महत्त्व या विषयावर हगलुर गावच्या ब्रांच पोस्ट मास्तर पूजा कांबळे यांनी महिलांना माहिती दिली. शिक्षणचं समाजात बदल घडवून आणू शकत म्हणून आपल्या मुला – मुलींना चांगल शिक्षण मिळावं यासाठी कुटुंबातील स्त्री – पुरुष दोघांनीही प्रयत्न केले पाहिजेत. कुटुंबाचं आरोग्य , मुलांचं शिक्षण व  सुरक्षित भविष्याचा विचार करता स्त्रियांनी बचतीचे महत्त्व जाणून बचतीचे नियोजन केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. 

     या कार्यक्रमावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागने यांनी महिला दिनी शुभेच्छा देत मत व्यक्त केले. 

यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोविड योद्धा म्हणून गावातील आशा व अंगणवाडी सेविका मनीषा बनसोडे,कांचन मस्के , शिला बनसोडे , शोभा बनसोडे ,   यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा देखील सत्कार  यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका एस. बी. मुल्ला यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे जाधव सर यांनी केले .यावेळी गावातील महिला व युवती कार्यक्रमास उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *