AgricultureBreaking NewsPolitics

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने दुध आंदोलन

शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त पाठींबा दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर पैलवानांना दुध पाजून आणि जोर बैठक व्यायाम करून तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना दुधाचे वाटप करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पंढरपूर/नामदेव लकडे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी अनेक ठिकाणी दुध आंदोलन पुकारण्यात आले होते. पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर पैलवानांना दुध पाजून आणि जोर बैठक व्यायाम करून तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना दुधाचे वाटप करून दुध आंदोलन करण्यात आले. यावेळी दुध संचालक यांना शेतकर्‍यांच्या  मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, संपर्क प्रमुख रायाप्पा हळणवर तालीम संघाचे अध्यक्ष सोमनाथ सुर्वे, अतुल करांडे,पप्पू पाटील नानासाहेब चव्हाण, रणजित बागल, अण्णा मोलणे, नितीन पाटील, अतुल गायकवाड, सावता राक्षे, विश्रांती भुसनर, चंद्रकांत म्हस्के इत्यादी सह अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!