स्वप्निल मनिषा पांडुरंग राऊत यांचा आदर्श कार्य गौरव समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान


प्रतिंनिधी/रविशंकर जमदाडे – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्यावतीने मा.स्वप्निल मनिषा पांडुरंग राऊत यांना आदर्श कार्य गौरव समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.स्वप्निल राऊत याने समाजिक कार्य आपला वेगळाच ठसा उमटविला आहे. आपल्या वाढदिवसा निमित्ताने दरवर्षी अपंग शाळा,मुकबधीर शाळा,एड्सग्रस्त मुलांची शाळा,वृधाआश्रम इ ठिकाणी दरवर्षी खाऊ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.शैक्षणिक स्तरावर राष्ट्रीय सेवा योजने मधुन राज्यस्तरीय शिबिरात सहभागी होऊन  विशेष प्रावीण्य मिळवले आहे एड्सग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या पालवी संस्थेच्या भुकेलेल्याला एक घास या संकल्पनेतून संस्थापक मंगलताई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बेघर,बेवारस लोकांना अन्नदान यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन अन्नदान करण्याचे काम केले.तसेच रविदत्त फिल्म प्रोडक्शन चे सदस्य असल्यामुळे शालेय स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करुन विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. शैक्षणिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या आडचणी सोडवण्यासाठी नेमही सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेकदा विद्यापीठस्तरावर आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.

अशा या आपल्या कार्याचा ठसा उमटविला.अनेकांना मदतीचा हात दिला.यावेळी त्याची समयसूचकता, नियोजन, कार्यतत्परता,सामाजिक संघटन कौशल्य दिसून आले.विद्यार्थी वाचवा संघटना,क्रांतिकारक युवा ग्रुप,टीम तरुणाई अशा अनेक संघटनामधून स्वप्निल समाज कार्य करत असतो.अशा या महान व्यक्तिमत्त्वाला आर्दश कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक अभिनंदन होत आहे.

Leave a Reply