Headlines

सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांच्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवा – एसएफआय

सोलापूर/शाम आडम  – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षा संदर्भात विद्यापीठाच्या वेबसाईट वरील अडचणी तात्काळ सोडण्यात यावे या मुख्य मागणीला घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांना निवेदन देण्यात आले.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला आहे.  विद्यापीठ काल परीक्षा वरून विद्यापीठ परीक्षा नियंत्रक व परीक्षा समितीचा ढिसाळ नियोजन समोर आले आहे.  परीक्षा समितीचा ऑनलाइन परीक्षांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात अयशस्वी ठरले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मृणालिनी फडणवीस मॅडम प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही ऑनलाइन परीक्षा घेण्यास सज्ज आहोत असे बोलल्या. 5 व 6  ऑक्टोंबर रोजीच्या ऑनलाइन परीक्षा या वरून कळतंय की विद्यापीठ परीक्षांच्या संदर्भात नियोजनशून्य आहे.

 

विद्यापीठाच्या सर्व्हर डाऊन, नेट प्रॉब्लेम, 90 मिनिटांचा परीक्षा लोगिन केल्यावर सोहळा ते तेरा मिनिटे वेळ दाखविणे, पहिले पान सबमिट करूही पुन्हा तेच पान दिसत आहे, विद्यापीठाने दिलेली हेल्पलाइन नंबर सतत बिझी  आणि स्विच ऑफ दाखवत आहे, आज तर वेबसाईट तोडा पूर्णपणे बंद होता असे सर्व समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. वरील सर्व चुका विद्यापीठ परीक्षा नियंत्रक व परीक्षा समितीची आहे. यांच्यावर विद्यापीठाने तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावे. आणि अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांच्या वेबसाईटचे वरील सर्व तांत्रिक अडचणी तात्काळ सोडविण्यात यावे. पुन्हा याच अडचणी विद्यार्थ्यांना येत असतील तर संघटनेच्या वतीने विद्यापीठावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आले.

 यावेळी एसएफआय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, सहसचिव शामसुंदर आडम, पल्लवी मासन, माजी सचिवा मीरा कांबळे, जि. क. सदस्य पूनम गायकवाड, दुर्गादास कनकुंटला, अश्विनी मामड्याल, लक्ष्मीकांत कोंडला, रोहित सावळगी, तौहिद कोरबू इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *