AgricultureBreaking News

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन ,बनावटगिरी आणि दलालाला बसणार आळा

  

सोलापूर  : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून याचे 94 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली.

            जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जमिनीची मोजणी करून देणे आणि नगर भूमापन (सीटी सर्वे) झालेल्या मिळकतीवर फेरफार नोंदणी घालण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 353 गावात सीटी सर्व्हे झाला आहे. जिल्ह्यातील परीरक्षण भूमापकाचे काम झाले असून अंतिम तपासणी करून लवकरच सर्व मिळकत पत्रिका जनतेला ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे श्री. सानप यांनी सांगितले.

            जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून यातील दोन लाख 82 हजार 684 मिळकत पत्रिकांची तपासणी करून प्रत काढण्यात आली आहे. राहिलेल्या 19 हजार 674 मिळकत पत्रिकांची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एक लाख 12 हजार 775 मिळकत पत्रिकांची डिजीटली स्वाक्षरीचे काम पूर्ण झाले असल्याने मिळकतदारांना लवकरच ऑनलाईन मालमत्ता पाहता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

            दुरूस्त केलेल्या मिळकत पत्रिकांची तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

करमाळा तालुक्यात 21864 मिळकत पत्रिका असून 90.29 टक्के तपासणी करून दुरूस्ती झालेल्या आहेत. माढा-29423 मिळकत पत्रिका- 74.71 टक्के, बार्शी-37751 मिळकत पत्रिका-100 टक्के, उत्तर सोलापूर-11451 मिळकत पत्रिका-89.54, मोहोळ-21584 मालमत्ता पत्रिका-85.25 टक्के, पंढरपूर-31643 मालमत्ता पत्रिका-98.15 टक्के, माळशिरस 29812 मालमत्ता पत्रिका-74.34 टक्के, सांगोला-22223 मिळकत पत्रिका-72.13 टक्के, मंगळवेढा- 15846 मिळकत पत्रिका-100 टक्के, दक्षिण सोलापूर-19017 मिळकत पत्रिका-68.5 टक्के आणि अक्कलकोट तालुक्यात 23812 मिळकत पत्रिका असून 82.43 टक्के दुरूस्तीचे काम झाले आहे. शहरातील नगर भूमापन कार्यालयातर्गत 35228 मिळकत पत्रिका असून 76.52 टक्के काम झाले असल्याची माहिती श्री. सानप यांनी दिली.

 मिळकत पत्रिकाबाबतचे कामकाज कसे चालते

·         हस्तलिखित मिळकत पत्रिका ऑनलाईन करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये घेतल्या जातात. (डाटा इन्ट्री)

·         सॉफ्टवेअरमध्ये घेतल्यानंतर परीरक्षण भूमापक तपासणी करतात.

·         डिजीटल प्रत काढून हस्तलिखित मिळकत पत्रिकेशी पुन्हा पडताळणी करून तपासणी केली जाते.

·         त्यानंतरच परीरक्षण भूमापक डिजीटल स्वाक्षरी करतात.

·         डिजीटल स्वाक्षरीनंतर कार्यालयीन प्रमुख फेरतपासणी करतात.

·         फेरतपासणी झाल्यानंतर जनतेसाठी ऑनलाईन मिळकत पत्रिका उपलब्ध होते.

 मिळकत पत्रिकांचे फायदे

·         नगर भूमापन झालेली मिळकत पत्रिका ऑनलाईन पाहता येईल.

·         कार्यालयात जाण्याची आणि हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही.

·         वेळ, पैशाची बचत होणार.

·         बनावटगिरी आणि दलालाला आळा बसेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!