Headlines

सूगाव खुर्द ग्रामस्थांनी वाहिली सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली

 सुगाव खूर्द येथे माजी आ. सुधाकर परिचारक यांना श्रद्धांजली वाहताना  सुगाव खुर्द ग्रामस्थ.

पंढरपूर/नामदेव लकडे -पांडुरंग सहकारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना सूगाव खुर्द ग्रामस्थांच्यावतीने शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.(कै.) सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच कोरोना आजारामुळे पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले होते. त्यांचा  अस्थी कलश आज दुपारी 11 वाजता सुगावा खुर्द गावात ग्रामस्थांच्या दर्शनासाठी आणण्यात आला होता.
अर्बन बँक, पांडुरंग आणि भीमा सहकारी साखर कारखाना आणि दूध संघाच्या माध्यमातून त्यांनी हजारो संसार उभे केले आहेत, त्यांनी अगणित लोकांना आर्थिक मदत देऊन जगायल शिकवले होते, असा हा लाखोंचा पोशिंदा अकस्मात काळाच्या पडद्याआड गेल्याने आणि त्यांचे शेवटचे दर्शनही घेता न आल्याने सूगाव खूर्द ग्रामस्थ शोकाकुल झाले होते. 
आज बुधवारी (दि. 19 ऑगस्ट) रोजी सूगाव  खूर्द  ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोक सभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेसाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना सुधाकर परिचारक यांना श्रद्धांजली वाहताना गहिवरून आले होते.यावेळी सरपंच दादा  गोपणे हेमंत  देवकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *