सुर्डीचे मतीन शेख यांना ‘आदर्श क्रिडा प्रसारक’ पुरस्कार जाहीर!

सातारा /विशेष प्रतिनिधी -: मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन,महाराष्ट्र राज्य (भारत सरकार संलग्न) यांच्याकडून दिला जाणारा ‘आदर्श क्रीडा प्रसारक २०२१’ पुरस्कार पत्रकार मतीन शेख यांना जाहीर झाला आहे.जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.असोसिएशनचे मुख्याधिकारी विनोद शिंदे,अध्यक्ष प्रा.अमोल साठे(एन.आय.एस),सचिव अभिजित तापेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

मतीन शेख रा.सुर्डी.ता.बार्शी चे सुपूत्र असुन कोल्हापूर येथे सकाळ माध्यम समुहात ते पत्रकारीता करत आहेत.त्यांनी क्रीडा क्षेत्रात पत्रकार म्हणून खेळाडूंच्या गुणवत्तेला,प्रश्नांना समाजासमोर आणण्याचे कार्य केले आहे.कुस्ती या खेळाला पडत असलेला डोपिंगचा विळखा या विषयावर त्यांनी सतत लिखान करत जनजागृती केली.तसेच ‘डोपिंग मुक्त कुस्ती’ या अभियानाची त्यांनी सुरवात केली आहे.याच कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहिर झाला आहे.

श्री.शेख हे नामवंत कुस्तीपट्टू कुस्ती सम्राट अस्लम काझी यांचे भांचे असुन ते देखील पत्रकारीतेत येण्या अगोदर चांगले मल्ल होते.पैलवान ते पत्रकारीता असा त्यांचा अनोखा प्रवास राहिला आहे.ते कुस्ती सह राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.तसेच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सहयोगी व्याख्याता म्हणुन ते काम पाहतात.क्रिडा क्षेत्रासह सामाजिक,राजकिय घडामोडींवर भाष्य,लिखाण करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रभावी लिखाणाच्या शैलीतले लेख,बातम्या तसेच लाईव्ह मुलाखती लोकांच्या पसंतीस उतरतात.त्यांना जाहीर झालेला या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply