Breaking News

सुधाकरपंत परिचारक यांच्या रुपाने जुन्या पिढीतला जेष्ठ मार्गदर्शक हरपला- चेअरमन कल्याणराव काळे


सहकार शिरोमणी परिवाराच्यावतीने सुधाकरपंत  परिचारक व राजुबापू पाटील यांना श्रध्दांजली

पंढरपूर/नामदेव  लकडे -सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष राजुबापू पाटील यांचे तसेच भोसे गावचे सुपुत्र बाळासाहेब कोरके यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांना सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना परिवाराच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान, सुधाकरपंत परिचारक यांच्या अकाली निधनामुळे जुन्या पिढीतील जेष्ठ मार्गदर्शक आणि राजुबापू पाटील यांच्या निधनामुळे तरुण पिढीचा हितचिंतक हरपला असून पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे., असे यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले.

प्राणघातक कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी निधन झाले. तसेच दोन आठवड्यापुर्वी कृषीराज फुडस प्रोडक्टसचे संस्थापक चेअरमन राजुबापू पाटील यांचेही निधन झाले.त्यांच्या निधनाने सहकार, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतीक, शेक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच जनसामान्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सहकार शिरोमणी परिवाराशीही या दोघांचे चांगले ऋणानुबंध होते. त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवाराच्यावतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे आपल्या मनोगतात म्हणाले सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्याचे 25 वर्षे विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत असताना जनसामान्याचे विविध प्रश्न मार्गी लावले. राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळत असताना एस.टी.महामंडळ ऩ़फ्यात आणले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे फार मोठे योगदान लाभले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,  सहकारी साखर कारखाने, विविध कार्यकारी सेवा सोसायटी अशा अनेक उद्योगाचे प्रभावी नेतृत्व त्यांनी केले. 50   वर्षाहुन अधिक काळ जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्या वैशिष्टपुर्ण कार्यपध्दतीमुळे सहकारातील ऋषीतुल्य नेता म्हणुन त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील अष्टपैलु जेष्ठ नेता हरपला आहे.
राजुबापू पाटील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना श्री.काळे पुढे म्हणाले, भोसे गावच्या पंचक्रोशीत आपल्या कार्यशैलीने राजुबापू पाटील यांनी जनसामान्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती पदाच्या तसेच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी समाज हिताची अनेक कामे करुन जनसामांन्याच्या ह्दयात स्थान निर्माण केले होते. गुळ कारखाना उभारून सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, राजूबापू पाटील यांच्या निधनाने एक चांगला सहकारी आपल्यातून हरपला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, माजी संचालक इस्माईल मुलाणी, निशिगंधा बँकेचे व्हाईस चेअरमन आर.बी.जाधव, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळेगुरुजी यांनी आपल्या मनोगतात  सुधाकरपंत परिचारक व राजुबापू पाटील यांच्या कार्याला उजाळा देवून श्रद्धांजली वाहिली.  प्रारंभी कल्याणराव काळे यांच्या हस्ते  सुधाकरपंत परिचारक आणि राजूबापू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात  आल्यानंतर उपस्थित मान्यवर, कारखान्याचे सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व  कामगारांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक कारखान्याचे सेक्रेटरी  एम.आर.मदारखान यांनी केले उपस्थितांचे आभार बाळासाहेब  कौलगे यांनी मानले. समाधान काळे यांनी सूत्रसंचालन केले. 
श्रद्धांजली सभेस कारखान्याचे  संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, दिनकर चव्हाण, भारत कोळेकर,  अॕड. तानाजी सरदार ,युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, माजी संचालक पांडुरंग  कौलगे, राजसिंह माने,  महादेव देठे , शहाजी पासले,दीपक गवळी,शिवाजी मदने, एमएससी बँकेचे प्रतिनिधी आर,एस.पाटील,श्रीविठ्ठल कारखान्याचे संचालक उत्तमकाका नाईकनवरे,जिल्हा परिषद मा.सदस्या सुरेखा लोखंडे,  प्रतिभादेवी  पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार,यशवंतराव पतसंस्थेचे माजी संचालक लक्ष्मण नलवडे, मुस्तफा बागवान, भाळवणीचे उपसरपंच अंबादास कुचेकर, धोंडीराम शिंदे,  माजी उपसरपंच दाऊदभाई मुलाणी, तानाजी केसकर, नारायण शिंदे, निलेश काळे, निशिगंधा सह.बँकेचे व्यवस्थापक कैलास शिर्के,श्रीराम शिक्षण संकुलाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कारखान्याचे  वर्क्स मँनेजर जी.डी.घाडगे, शेतीआधिकारी पी.जी.शिंदे, को-जन मँनेजर ए.बी.गाजरे,सिव्हिल इंजिनियर एन.एम.काळे,परचेस अॉफिसर चंद्रकांत कुंभार, डेप्यु.चिफकेमीस्ट विजय सावंत, कार्यालय अधिक्षक.सी.एस.गायकवाड, गोडाऊन किपर के.जी.जाधव, केनयार्ड सुपरवायझर डि.डि.काळे,सभासद शेतकरी,वाहन मालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!