सीईटी ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाइन पद्धतीने सीईटी करिता अर्ज सादर केले होते परंतु फी भरवायची राहिली होती किंवा जे विद्यार्थी विहित कलावधीत अर्ज भरू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणार्‍या खालील १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सोमवार दि.०७ सप्टेंबर २०२०(००.००Hrs) ते मंगळवार दि.०८ सप्टेंबर २०२०(२३.५९ Hrs) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे व एक विशेष बाब म्हणून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे. 
1. उमेदवारांना सूचित करण्यात येत की सदर  ही अंतिम संधी आहे.
2. ज्या उमेदवारांनी या आधी प्रवेश अर्ज सादर केलेले आहेत त्यांना त्यांच्या अर्जात भरलेल्या माहितीत बदल करता येणार नाही .
3. परीक्षा केंद्र बादल करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही .
4. ज्या उमेदवारांनी आधी आपले अर्ज सादर केलेले आहेत ते उमेदवार नवीन अर्ज करू शकतात , परंतु त्यांनी आधी भरलेले शुल्क त्यांना परत मिळणार नाही अशा उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्र नवीन अर्जाच्या आधारे तयार करण्यात येईल.
5. उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या आधी महितीपुस्तिका व अर्ज भरण्याची विशेष सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. एकदा सादर केलेला अर्जात कोणताही बादल करता येणार नाही .
6. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार्‍या महाविद्यालय व संस्था यांनी उमेदवारांना प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास मदत करावी.
7. सीइटीचे नवीन सुधारित वेळापत्रक व परीक्षेचे प्रवेश पत्र मिळविण्यासाठीची सुचन व लिंक अभ्यासक्रमाच्या स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
शब्द संकलन -अश्विनी कुणके 
विशेष : काही शंका असल्यास उमेदवारांनी मूल इंग्रजी सूचना वाचावी-https://bit.ly/2Z6LLii
मराठीमध्ये सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://bit.ly/35c6WDD

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *