Breaking NewsRTO

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू


 सोलापूर : मार्च अखेर असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहनाचा ताबा मिळावा यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाचे निर्देश असून यानुसार सोलापुरातील नवीन नोंदणी विभाग, थकीत कर वसुली व खटला विभाग सुरू राहणार आहे. 

गुरूवार दि.11 मार्च 2021 (महाशिवरात्री), शनिवार दि. 13 मार्च, रविवार दि.14 मार्च, शनिवार दि. 20 मार्च, रविवार दि. 21 मार्च, शनिवार दि.27 मार्च, रविवार दि.28 मार्च आणि सोमवार दि.29 मार्च 2021 (धुलिवंदन) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. डोळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!