सांगवी येथील कृषिकन्येने बनवलेल्या व्हिडिओची शेतकऱ्यांना होतेय मदत

                            डॉ. ज्योती झीरमिरे यांच्या यूट्यूब चॅनल चा स्तुत्य उपक्रम
उस्मानाबाद:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात प्रचंड पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकाच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ऑनलाइन दाखल करण्याचे निर्देश जिल्हा कृषी अधीक्षक व विमा कंपनी ने दिले आणि सर्व शेतकऱ्यांची अर्ज करण्याची घाई सुरू झाली. पण अँप नेमके कसे वापरायचे याविषयी खूप शेतकऱ्यांना अडचणी होत्या. ही अडचण ओळखून सांगवी ता. उस्मानाबाद येथील कृषिकन्या डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमीरे यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक माहितीपर व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियात प्रसारित केला. सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत हा व्हिडिओ आहे, त्यामुळे दोन दिवसात तब्बल १ हजार शेतकऱ्यांकडून तो पाहिला गेला आहे. डॉ. ज्योती या शासकीय कृषी महाविद्यालय उस्मानाबाद येथिल बीएससी एग्रीकल्चर च्या माजी विद्यार्थिनी आहेत. नंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी , अंतर्गत शासकीय कृषीमहाविद्यालय  लातूर येथून एम एस सी एग्रीकल्चर केले व भारतीय कृषि अनुसंधान नवी दिल्ली अंतर्गत कृषी विश्वविद्यालय धारवाड मधून डॉक्टरेट केलेले आहे. सध्या शासकीय पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय चाकूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या ज्ञानाचा उपयोग करून सर्वसामान्य शेतकऱ्याला कसा फायदा होईल याचा विचार करून त्यांनी ॲग्रीमेनिया या यु ट्युब चॅनेल चा शुभारंभ केला आहे व पहिल्याच व्हिडिओला एक हजार शेतकऱ्यांनी पाहिले गेलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून अधिक माहिती मिळवावी असे आव्हान डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे यांनी केले आहे.

Leave a Reply