Headlines

सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची नांगोळे च्या मियावाकी प्रकल्पाला भेट

सांगली/सुहेल सय्यद -21 व 22 नोव्हेंबर 2020 रोजी नांगोळे ता. कवठेमहांकाळ येथे ‘मियावाकी वनराई’ हा कृत्रिम जंगल निर्मितीचा उपक्रम अध्यक्ष तब्रेज खान यांच्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली व जलबिरादरी (तरुण भारत संघ) यांच्या मार्फत इमदाद मल्टीपर्पज फॉउंडेशन कवठे महांकाळ यांच्या श्रमदानातून नांगोळे या गावात एका डोंगराच्या उतारावर यशस्वीरित्या राबविण्यात आला.

    देशातील पाणी संवर्धन क्षेत्रात काम करणारी एक नामांकित स्वयंसेवी संस्था ‘जलबिरादरी’ यांच्यासाठी नेकॉन्स हा उपक्रम राबविणार आहे.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी स्थापन केलेल्या  संस्थेतर्फे २०१३ सालापासून, सांगली जिल्ह्यातील अग्रणी खोऱ्यात ‘अग्रणी नदी खोरे पुनरुज्जीवन’ हा जलसंवर्धन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत नांगोळ्यातील डोंगराच्या उतारावर एक छोटी ‘मियावाकी वनराई’ साकारण्यात आली. यांच्या मार्फत झाडांची लागवड करण्यात आली. शालीना लॅबोरेटरीज प्रा.लि. मुंबई यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य केले आहे.

    या प्रकल्पास रविवार 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांची भेट दिली. या वेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी इमदाद मल्टिपर्पज फौंडेशन ने मियावाकी प्रकल्पा मध्ये केलेल्या श्रमदानाची दखल घेऊन इमदाद मल्टिपर्पज फौंडेशन चे अध्यक्ष हाफिज रमजान यांच्याशी संवाद साधला, या कामाचे कौतुक केले.

व इमदाद मल्टिपर्पज फौंडेशनच्या सामाजिक कार्याची बाबत सर्व माहिती घेतली.या वेळी कवठेमहांकाळ चे मा. तहसीलदार बी.जे.गोरे साहेब, कवठेमहांकाळ नगरपंचायत चे C.E.O. मा.संतोष मोरे साहेब, जलबिरादरी चे सर्व मान्यवर, नॅशनल कांजर्वेशन सोसायटी सांगलीचे सर्व पदाधिकारी, इमदाद मल्टीपर्पज फौंडेशन चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *