सरसकट वीजबिल माफीसाठी गोदूताई परुळेकर वसाहतीतील नागरिक आक्रमक , माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आंदोलन

सोलापूर –  लॉकडाऊन च्या कालावधीत  कॉ.गोदूताई परुळेकर वसाहती मधील अ विभागातील लाभार्थी घर क्रं 804/4  कविता शंकर चिप्पा यांना 47 हजार रुपये वीजबिल तर  कॉ मीनाक्षीताई साने लाभार्थी घर क्रं 411 लता लक्ष्मण मडूर यांना 3 लाख 44 हजार रुपये वीज बिल पाठवण्यात आले.विशेष म्हणजे या घराचा ताबा घेतला असून प्रत्यक्ष विजेचा वापर होत नसताना हे बिल पाठवले याची तक्रार करताच मीटर काढून घेतले.महाराष्ट्र वीज महावितरण कंपनीचा हा अजब कारभाराची धास्ती घेत आहेत.एका अर्थी हे घरजप्तीची नोटीसच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केली.
 सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने  कुंभारी येथील कॉ गोदूताई परुळेकर नगर येथे सरसकट वीज बिल माफ करा ही प्रमुख मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव अँड एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा  मा.अधीक्षक अभियंता कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  गोदूताई नगर कार्यलयाला घेराव घालण्यात आला.यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे चांगलीच दमछाक झाली.  
यावेळी शिष्टमंडळामार्फत सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, सिद्धपा कलशेट्टी,कुरमय्या म्हेत्रे, फातिमा बेग, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी,बापू साबळे, हसन शेख,दत्ता चव्हाण,आरिफा शेख, कलावती चिप्पा आदींनी कार्यकारी अभियंता श्री. ए.पी.ओहाळे यांना निवेदन देऊन वीजबिल माफ करण्याबाबत चर्चा करण्यात आली.चर्चेअंती सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी निर्णय घेण्यासंबंधी सिटू च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.  
पुढे बोलताना आडम म्हणाले की, 15 दिवसात जर वीजबील माफ करण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास अक्कलकोटला  जाणार्‍या  राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोखो करणार असल्याचा इशारा दिला .
मा.अधीक्षकांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सोलापूर येथील मौजे कुंभारी हद्दीत विडी कामगार महिलांनी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान व सहकार्यातून कॉ. गोदुताई परुळेकर नगर विडी कामगारांची वसाहत उभी केली आहे. या परिसरात कॉ. मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था व श्री. स्वामी समर्थ महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थानी हि विडी कामगारांकरिता गृहनिर्माण योजना राबविली आहे. या वसाहतीतील रहिवाशी प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील महिला विडी कामगार असून या विडी कामगारांना वीज वितरण विभागाने सवलतीच्या दारात वीज जोडणी दिली आहे. वसाहतीतील नागरिक आर्थिक परिस्थितीने गरीब असले तरी त्यांनी वापरलेल्या विजेची आकारणी नियमितपणे वेळेवर भरलेली आहे. या वसाहतीचे थकबाकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 
मार्च महिन्यामध्ये अचानकपणे कोरोना या संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांचे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेले विडी कारखाने बंद झाले. दर आठवड्यास मिळणारी मजुरी बंद झाली. कांही सामाजिक संस्थांनी मदत केल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दोन वेळच्या उदरनिर्वाहाची सोय झाली. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात होती व आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर सुद्धा विडी कारखाने सुरु करण्यासाठी या विडी कामगारांना आंदोलन करावे लागले. तेंव्हा आता कुठे तरी विडी कारखाने ४ महिन्यानंतर सुरु होऊन रोजगार कमी अधिक प्रमाणात मिळू लागला आहे. 
कॉ. गोदुताई परुळेकर विडी घरकुल परिसरातील वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने ४ महिन्याचे वाढीव वीज एकत्रित दिले आहे. सरासरी एका घरास ३ ते ४ हजार रुपयांचे वीज बिल आले आहे. सदरचे वीज बिल भरणे हातावरील पोट असलेल्या महिला विडी कामगारांना शक्य नाही. दिवसाकाठी राबून ८० ते १०० रुपये रोजगार मिळवणारा हा कामगार ३ ते ४ हजार रुपयांचे वीजबिल कसे भरणार. यामुळे यांचे वीजबिल सरसकट माफ करावे व या परिसरातील महावितरण विभागाच्या कांही त्रुटीमुळे या कष्टकरी कामगारांना त्रास होत आहे. 
आंदोलनात खालील मागण्या करण्यात आल्या :- 
१. ८२२ विद्युत मीटर फॅाल्टी असून तातडीने बदलणे गरजेचे आहे. 
२. प्रत्येकाचे विद्युत मीटर घराबाहेर असून सुध्दा रीडिंग उपलब्ध नाही असा शेरा मारून अंदाजित बिले दिले जातात. 
३. या परिसरात जवळपास ११ हजार विद्युत ग्राहक असून या ठिकाणी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरु करणे गरजेचे आहे. 
४. या परिसरामध्ये जवळपास तीन ठिकाणी ए.बी. स्विच बसविणे अत्यंत गरजेचे आहे. 
५. ग्राहकांची संख्या लक्षात घेता रात्र पाळीकरिता अनुभवी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक होणे गरजेचे आहे. 
६. ११ हजार विद्युत ग्राहकांच्या विद्युत मीटरची तपासणी करून तांत्रिक अडचणी दूर करण्यात यावे. 
७. कॉ. मीनाक्षीताई साने येथे ८० विद्युत खांबे उभे केले आहेत. परंतु त्यांना विद्युत तारा ओढण्यात आलेले नसून त्या ठिकाणी राहण्यास आलेल्या कामगारांना विद्युत पुरवठा जोडणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 
८. ग्राहकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी ४ ते ५ ठिकाणी विद्युत ट्रान्सफार्मर बसविणे अत्यंत गरजेचे आहे. 
९. ग्राहकांचे तक्रार निवारण होण्याकरिता या परिसरात कायम स्वरूपी तक्रार निवारण कक्ष सुरु करून कर्मचारी नेमण्यात यावा. 
१०. नवीन विद्युत ग्राहकांना गेल्या ५ महिन्यापासून विद्युत मीटर उपलब्ध नसल्या कारणाने नवीन जोडणी देत नाहीत. 
११. सौभाग्य योजनेमध्ये जे कांही विद्युत कनेक्शन देण्यात आलेले आहेत. त्या ग्राहकांना चुकीच्या विद्युत बिलांची आकारणी आलेली आहे, तरी बिलांची चौकशी होऊन ते बिले दुरुस्त करून द्यावे. 
यावेळी लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा.इंधन समायोजन आकार व वहन आकार बंद करा.भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा.फॉल्ट विद्युत मीटर बदलून मिळालेच पाहिजे.नवीन शाखा कार्यालय चालू करा, इन्कलाब जिंदाबाद , सिटू जिंदाबाद अशा गगनभेदी आवाजात घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडले. 
यावेळी युसूफ मेजर, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी सिद्धप्पा कलशेट्टी, फातिमा बेग,आरिफा शेख  मुरलीधर सुंचू ,अनिल वासम हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सिद्धपा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, अँड एम.एच.शेख आदींनी सभेला संबोधले. सूत्रसंचालन कॉ बापू साबळे यांनी केले. 
विल्यम ससाणे ,वसिम मुल्ला,बापु साबळे,हसन शेख,विक्रम कलबुर्गे ,अप्पाशा चांगले ,सनातन ‌म्हेत्रे,वसिम देशमुख,विजय हरसुरे,प्रभाकर गेंट्याल ‌,मधुकर चिल्लाळ,,योगेश अकिम,इमाम शेख,नागेश ‌जल्ला,बालाजी तुम्मा,विनायक भैरी,नरेश गुल्लापल्ली ,जैद मुल्ला ,योहान सातालोलु,शकील आगवाले,सादिक मुस्तफा,महिबुब मनियार,आतिक दंडोती,जाविद पठाण,डेव्हिड शेट्टी,बाळु म्हेत्रे,आरिफा शेख,खादर शेख,अफसर शेख,राजु वाघमारे,शफी शेख,एजाज खलिफा,सैफन मकानदार,मोहन बडगु,दिनेश बडगु,रामस्वामी भैरी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply