Headlines

सरकार कामगार, शेतकरी विरोधी कायदे करत देश अदानी अंबानीच्या घशात घातला जात आहे- काॅम्रेड तानाजी ठोंबरे

 बार्शी /अब्दुल शेख  – अखिल भारतीय किसान सभा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, आॅल इंडिया स्टुडन्टस् फेडरेशन यांच्या संयुक्त वतिने देशव्यापी संपाचा भाग  म्हणून 26 नोव्हेंबर 2020 रोजी मा. तहसिलदार यांचे कार्यालयावर निदर्शने व धरणे अंदोलन करण्यात आले.  हे अंदोलन काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.  यावेळी वेगवेगळया संघटनांचे पाचशेच्या वर कार्यकर्ते सहभागी झाले होते.  घोषणा देत तहसिलदार कचेरीवर परिसर दणानुन सोडला होता. मोर्चात आयटक संलग्न ग्रामपंचया कर्मचारी संघटना, अखिल भारतीय किसान सभा, बांधकाम कामगार, विज वर्कर्स फेडरेशन, डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघ, घरेलू कामगार संघटना, एआयबीए महाराष्‍ट्‍र बैक, युनियन बैक कर्मचारी, आॅल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशन, इंटक गिरीणी कामगार संघटना, कन्फेग्रेशन फ्री ट्‍रेड युनियन आॅफ इंडिया या कामगार, शेतकरी, विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या.

 यावेळी काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, देशात कामगार व शेतकरी विरोधी कामदे करत, देश आदानी व अंबानी यांच्या घशात घातला जात आहे, परंतू देषातील श्रमिक हे कदापी होवू देणार नाहित, पुढील काळ तिव्र लढ्याचा आहे याची हि झलक आहे, आज  संपात देशातील लोखो कामगार आज सरकारच्या विरोधात उभे आहे, ते हा कामगार शेतरकी विरोधी लढा विचारांच्या आढारे जिंकतील. असा विश्‍वा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 आंदोलांचे  निवेदन मा. तहसिलदार ़प्रदीप शेलार  यांनी स्वीकारले, योवळी विज मंडळ अधिकारी, बीडीओ, सा.बा.अधिकारी, कृशी अधिकारी उपस्थीत होते.  स्थानिक पातळीवर मागण्याबाबत अंमलबजावणी करूत व इतर मागण्या शासनास कळवत असल्याचे ते यावेळी तहसिलदार म्हणाले.

 निवेदनात  मागण्या पुढील प्रमाणे होत्या, कामगार व शेतकरी विरोधी जे  कायदे केंद्र सरकार संमत करीत आहे ते तातडीने बंद करा, किमान वेतन ऐकेविस हजार करा, सर्वश्रमजिवी जनतेला पेन्‍शन, प्राव्हीडंन्ट फडं चालू करा, खाजगीकरण, कंत्राटीकर बंद करावे, बैंकाचे एकत्रीकरण थांबवावे, शिक्षण-आरोग्याचे खाजगीकरण, महागाई, बेरोजगारी थांबवा, शेतकरी सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग, पिकविमा व दुश्काळ निधी, रोजगार हमीची अंमलबजावणी करा, कामगार भरती सुरू करा, रेशन सुरू करा, बांधकाम, घरेलू, औद्योगीक कामगारांचा नोंदणी सुरू करून शासकीय सुविधा द्यात, ग्रामंपचायत कर्मचार्‍यांना किमान वेतन 11 हजार व 14 हजार लागू केले,  शासनाने त्याची तरतुद करून कर्मचार्‍यांना हे वेतन आॅनलाईन द्यावे.  राहणीमान भत्ता ग्रामपंचायत देत नाही त्यासाठी त्यांच्यावर कार्यवाही करा. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना  100 टक्के वेतन मिळाले पाहिजे, मार्केट कमीट्या बरखास्त करण्याचा कायदा त्वरीत रद्द करा, बांधकाम कामगारांची नोंदणी आॅनलाईन प्रमाणे आॅफलाईन ठेवण्यात यावी, बांधकाम कामगारंाना ताबडतोब दोन हजार व तिन हाजार रूपये रक्कम मिळावी, उपयोगी साहित्य मिळावे तसचे बांधकामाचे साहित्य खरेदी साठी पाच हजार रूपये मिळावेत, शिष्‍यवृत्तींचे अर्ज तातडीने निकालात काढून बांधकाम कामागरांच्या मूलांना षिश्यवृत्ती मिळावी, औषधे व वैद्यकीय उपकरांवरील जीएसटी रद्द करा, विद्युत कायदा 2018 रद्द करा.  विद्युत क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा, बार्शी मधील एनटीसीची बार्शी मिल तातडीने चालू करा, एनटीसी मिल्स कामगारांना 100 टक्के पगार द्या, बार्शी मध्ये कामगार अधिकारी पुर्ण वेळा मिळावा, घरेलू कामगारांचे मंडळ चालू करा.  घरेलू कामगारांना सन्मान योजना निधी द्यात, अतिवृष्‍टीमूळे नूकसान झालेल्या शेतीचे बांधबंस्तीचे  ताली , नाले  दूरूस्तीचे काम त्वरीत सुरू करा,  पानंद रस्ते राहोयो अंतर्गत व इतर कामे चारे, श्रीपतपिंपरी, काटेगांव, धामनगांव, बाभळगांव, घाणेगांव येथील कामे व्हाव सन्मान योजनेची त्वरीत अमंलबजावणी करा, सन्मान योजनेचा निधी शेतकर्‍यांना द्या, चालू खरीप हंगामाचा भररेल्या विका त्वरीत मिळावा, पीक विमा 2020 खरीप वीमा त्वरीत मिळावा, बार्शी तालूक्यात शेतीसाठी दिवसा लाईट पूरवठा मिळावा, 2018-2019 चा दुष्‍काळ निधी मिळावा, प्रत्येक कामगार संघटनांच्या अंतर्गत त्या त्या संघटनांच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.

आंदोलन  सभेचे सुत्रसंचलन काॅम्रेड प्रविण मस्तुद यांनी केले, काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, नागजी सोनवणे, काॅमे्रड लक्ष्मण घाडगे, अशोक गलांडे, काॅम्रेड शौकत शेख, काॅम्रेड अनिरूध्द नखाते, घावटे आप्पा, अभिजित बारसकर, काॅम्रेड सरिता कुलकणी, नागजी सोनवणे, अभीजीत चव्‍हाण, पवन आहिरे, भारत भोसले, भारत पवार, अयाज शेख, काॅम्रेड लहू आगलावे, काॅम्रेड भारत भोसले, धनाजी पवार, भाउसाहेब गोविंदे, अमर मुजारवर, विठ्ठल शिंदे, बाळासाहेब चांदणे, संतोश जामदार, नवनाथ कांबळे, रशिद इनामदार, साखरे, पांडूरंग यादव, कुंडलीक होवाळ, दत्ता कदम, बापू सुरवसे, मूलाणी देवगावकर, खंडू कोळी, लाटे गौडगांवकर, बळी बोकेफोडे, गौतम गव्हाणे, बैक अधिकारी सुर्यवंशी, किसन मुळे, सत्यजित जानराव, काॅम्रेड शाफीस बागवान, बालाजी शितोळे, मुच्चू शेख, मुमताज शेख, लक्षमी नेवसे, जयश्री गंगावणे, आनंद धोत्रे, जयवंत आमले, संगिता गुंड बिभीशन हुरकडे, शिवाजी घाडगे, बालाजी ताकभाते, राम कदम, आप्पा घाडगे, धनंजय गोरे, लोखंडे, बाळासाहेब जगदाळे, शेषराव जगदाळे, जयराम जदाळे, सुनिता निकम, उमेश शेलार, प्रसाद पवार, रामेश्‍वर सपाटे, नागनाथ गोसावी, अमोल तिकटे, लक्ष्‍मी मोहिते, रेखा सरवदे, इंदु भगत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *