Breaking NewsPolitics

सय्यद वसीम यांची समन्वयक पदी निवड

सोलापूर/जयकुमार सोनकांबळे  : महाराष्ट्र युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम तसेच युवा सेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच संपन्न झालेले सोलापूर शहर/ जिल्हा युवासेना मेळाव्यामध्ये सय्यद वसीम यांची शहर समन्वयक (शहर मध्य विधानसभा) पदी निवड करण्यात आली . या वेळी युवासेना शहर युवाधिकरी विठ्ठल वानकर , जिल्हा युवाधिकरी मनीष काळजे व असंख्य युवासैनिक उपस्थित होते. निवड झाल्यानंतर सय्यद वसीम यांनी पक्षवाढीसाठी व युवकांचे रोजगार , वैद्यकीय सारखे इत्यादी प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान करणार तसेच जनतेचे सेवक म्हणून काम करून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  व युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे   यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले तसेच युवासेनेचे माध्यमातून समाजहिताचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल शहर युवाधिकारी विठ्ठल वानकर , शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर यांचे आभार मानले . प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य  एजाज़ शेख व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख शंकर वडने, जिल्हाध्क्ष गुरुनाथ वांगीकर, शहर अध्यक्ष सरदार नदाफ, शहर उपाध्यक्ष रिझवान शेख, बब्बू कुरेशी, फरहान बागवान , हारिस शेख, समीर चौधरी, जीशान शेख,आसिफ शेख, अनवर बिजापूरे,  यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . सय्यद वसीम यांच्या निवडीने समाजा मध्ये सर्वस्तरातून स्वागत होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!