सम्यक विद्यार्थी च्या वतीने विद्यार्थी व पालक संवाद

 

प्रतिंनिधी/जयकुमार सोनकांबळे- कोरोना चा संसर्ग जनक परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील विद्यार्थी व पालक वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या हवालदिल झाले आहेत ऑनलाईन शिक्षण शिष्यवृत्ती,परीक्षा खोळंबा अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत या विद्यार्थ्यांना संकटाच्या काळात मदतीची व मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे ,याकरीता सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विद्यार्थी संपर्क संवाद अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून काल सिन्नुर येथे विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधण्यात आला यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी सदस्य तथा अक्कलकोट तालुका अध्यक्ष रविराज पोटे, गंगाराम वाघमारे,साहिल कांबळे, यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला याप्रसंगी जयकुमार सोनकांबळे सर,आदीसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply