Headlines

सनी लिओनीने चाहत्यांना केले “हे” आवाहन

मुंबई – लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करावे यासाठी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी त्यांना प्रोत्साहित करत आहे.


कोरोनाच्या दुसरा लाटेत अनेक जण चिंताग्रस्त आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार लोकांना लगेच घेण्याबद्दल जागृत करत आहेत. सनी लियोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आपल्या चहात्यांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.


सनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आपल्या फोटो सोबत लिहिले आहे. चला कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये आपण सगळेच सामील होऊ. ही वेळ लसीकरणाची आहे. सनीने आपल्या पोस्ट मधून लोकांना आग्रह केला आहे की त्यांनी स्वतःहून लस घ्यावी तसेच आपल्या कुटुंबातील लोकांचा लसीकरण करून घ्यावे.

Leave a Reply