सततच्या पाऊस वार्‍याने शेडनेटचे झाले नुकसान

सिंदखेड राजा/बालाजी सोसे – पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा शिवारामध्ये दिनांक २०ते२१/९/२०२० रोजी झालेल्या मुसळधार पाऊस वारा सोबत असल्याने  शेडनेट झाले उध्वस्त यामुळे या परिसरामध्ये बीज उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याची खूप मोठे नुकसान  झालेली आहे .त्यामुळे या परिसरातील संपूर्ण शेडनेटचे पंचनामे करून त्यांना मदत द्याव  अशी मागणी येथील बीज उत्पादक शेतकरी करत आहे. या परिसरामध्ये या अगोदर मुख्य पिक मूग. पूर्णे उद्ध्वस्त झाला. आता कपाशी गेली .उडीद गेला  .सोयाबीन गेली . मक्का गेली. आता शेतकऱ्यांच्या हाती काही नाही  राहील शेतकऱ्यांनी काय करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला त्यामुळे सरसकटपणे  पंचनामे करून शेतकऱ्याला थेट मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे. 

Leave a Reply