Headlines

सखी फौंडेशन कार्यालयाचे थाटात उदघाटन


सोलापूर/अमीर आत्तार  – महिलांच्या मदतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, बेरोजगार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सोलापूर येथे सखी फौंडेशन नावाने खास महिलांसाठी संस्था सुरु केली असून त्याच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वल करून करण्यात आले .सखी फौंडेशन च्या माध्यमातून महिलांसाठी करत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रम बद्दल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सखी फौंडेशन च्या ही धर्मदाय आयुक्त सोलापूर येथील कार्यालयात नोंदणीकृत संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून वधू वर सूचक मेळावा ,युवतींना रोजगार व आर्थिक बळ.महिला व युवतीना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळे शिबिरे आयोजित करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शन घेऊन स्वावलंबी बनवणार,सखी फौंडेशन च्या अंतर्गत महिला बचत गट निर्माण करून महिलांना प्रशिक्षण देऊन  छोटा मोठा व्यवसाय करण्यास साहाय्य नारी शक्ती महिला सबलीकरण, वृद्ध विधवा अन्यायग्रस्त वंचित पिढीत महिलांच्या पुनर्वसन साठी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न,आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याची माहिती सखी फौंडेशन च्या सचिव सौ पद्मिनी येळणे यांनी यावेळी दिली.  

तसेच महिलांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महिलांना नक्कीच स्वाभिमानीने जगण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष सौ गीता पवार यांनी यावेळी सांगितले .

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ पवार डॉ रवींद्र सोरटे  शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार,उपाध्यक्ष प्रभाकर एडके धसका न्यूज नेटवर्क चे संपादक अक्षय बबलाद, नयन यादवाड प्रसाद ठक्का इस्माईल शेख  श्रीनिवास पेद्दी, भास्कर अल्ली, प्रसाद जगताप, सह सखी फौंडेशन च्या विद्या जाधव, प्रियंका पवार(उपाध्यक्ष ),वैशाली लोंढे, आम्रपाली कसबे, सुनीता ढगे  इत्यादी उपस्थित होत्या .

सखी फौंडेशन च्या अध्यक्षा गीता पवार यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने शहर संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार कसबे, रतन येळणे, ज्योतिबा मुळे, तरुण येळणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *