Headlines

संत विचारातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद

 

 

राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद दूरदर्शनवर कार्यक्रमाचे सादरीकरण करताना 





लोककला ही आपली सांस्कृतीक परंपरा आहे . तीचे  जतन , संवर्धन आणि सादरीकरण पुढील पिढीला  होण गरजेचं आहे . त्यामुळे तरुण पिढीनं ही कला आत्मसात करून त्या माध्यमातून समाज जागृती करावी .विविध सामाजिक विषयावर या माध्यमातुन भाष्य करावं जेणेकरुन व्यसनमुक्ती  ,पर्यावरण, स्वच्छता , बेटी बचाओ, अशा सामाजिक विषयावर प्रबोधन होईल . स्वयं रोजगाराच्या अनेक योजना याची माहिती तरुणांना होऊन सक्षम भारतीय नागरिक तयार होतील आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल.




प्रश्न- मागील  वर्षी पद्म पुरस्कारासाठी तुमचं नामांकन झाले होते ,त्याबदल आपली प्रतिक्रिया काय ?

उत्तर- माझ्या प्रबोधन भारुड कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे . त्यात पद्म साठी कला क्षेत्रात नामांकन  झाले  होतं. नामांकन होणंच माझ्यासाठी खूप आनंददायी होत . तो एक अविस्मरणीय क्षण होता.


प्रश्न-भारुडाची आवड कोठून व कशी निर्माण झाली ?

उत्तर- मला लहानपणापासून कलेची आवड होती. शाळेत असताना कविता म्हणणे, देशभक्ती गीत म्हणणे असे चालूच असायचं . मी पहिल्यांदा शाहिरी कलापथकात खूप वर्षे काम केलं. शाहीर कल्याण काळे पाटील यांच्या पथकात नंतर एकदा भारूडकार चंदाताई तिवाडी पंढरपूरकर यांचं पुणे आकाशवाणी वर भारुड ऐकलं मला खूप आवडले . असच एकदा प्रत्यक्षात त्यांचं भारुड कार्यक्रम पहिला आणि  त्यातील गायन,निरूपण, रंजकता, नाट्य, अभिनय,आध्यात्मिक भाव मला आकर्षित करून गेलं.  त्यातील संत विचारातून मनोरंजनातून केलेल्या समाजप्रबोधन बद्दल मला खूप आकर्षण निर्माण झालं . मला असं वाटलं आपण अस केलं तर आणि मी मग नेहमी भारुड ऐकू लागलो पाहू लागलो . अस करता करता , मी ते आत्मसात केले . स्वतःच्या मनाने एक वेगळा आशय बनून ते सादर करू लागलो.


प्रश्न -मुस्लिम कलावंत म्हणुन काहीं अडचणी आल्या का ??

उत्तर – खरं तर कलावंत हीच त्यांची जात असते . कुठली कला जात, धर्म, वंश ,पंथ पाहून जन्म घेत     नाही ती उपजत इश्वरिय देणगी असते . अडचणी तर खूप आल्या पण त्याला न जुमानता माझा प्रवास चालू राहिला .थोडं समाजातीलच लोकांनी समजावले पण मी दुर्लक्षच केले . माझा कला प्रवास निरंतर  चालू ठेवला उलट काही ठिकाणी एक मुस्लिम कलावंत म्हणून आवर्जून कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 

प्रश्न – तुमच्या बालपणाविषयी थोडक्यात सांगा ?

उत्तर –माझे प्राथमिक शिक्षण भातकुडगाव ता शेवगांव जि. अहमदनगर मध्ये झाले. एक अत्यंत गरीब कुटूंबात भातकुडगाव येथे माझा जन्म झाला. वडील मोलमजुरी करत संपूर्ण गावात कावडीने पाणी वाहून मिळालेल्या मजुरीतून कुटुंब चालवत होते. 2 मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आणि मी शेंडेफळ म्हणजे सर्वात लहान आई वडिलांचा लाडका होतो.  वडिलांचे मूळ गांव बेनवडी ता.  कर्जत जि . अहमदनगर परंतु 72 च्या दुष्काळात कामाच्या शोधत भातकुडगावी आले . प्रथम सालगडी म्हणून काम केलं . कालांतराने पाणी वाहण्याचे काम आणि मार्केट मध्ये हमाली केली. वडिलांनी खूप कष्टातून संसार उभा केला व बहिणीची  लग्न केली , आमचे सर्वांचे  शिक्षण पूर्ण केले , सर्व मजुरी वर केले कारण आम्ही भूमिहीन आहोत.


प्रश्न – भारूडाच्या माध्यमातून समाजात झालेले कोणते बदल तुमच्या निदर्शनास आले आहेत ?

उत्तर- माझ्या भारुडाच्या  माध्यमातून लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होत आहे.संत विचारातून समाज प्रबोधन हे ब्रीदवाक्य घेऊन मी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करत आहे.या कार्यक्रमात अनेक युवक नशा मुक्त झाले आहेत .गावांमध्ये महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी  गावागावात महिला बचत गट निर्माण होत आहेत.

ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने पाणी आणि स्वच्छता या विषयावर सलग तीन वर्षापासून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची  भारुडाच्या माध्यमातून जनजागृती केली. याचा परिणाम असा म्हणता येईल की गावागावात शौचालय  उभे राहत आहेत.लोकांना स्वच्छतेचे महत्व कळाले आहे.

 

 
                                          

 प्रश्न – आजतागायत तुम्हाला कोणकोणते सन्मान मिळाले आहेत ?

उत्तर – महाराष्ट्रातील संतांच्या आध्यात्मिक परंपरा , संस्कृती वारसा आणि समाज प्रबोधनाच्या हेतूने लोककले मधील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकार आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यस्तरीय व  जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1)संत रविदास पुरस्कार -2007

२)भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाचा नेहरू युवा गौरव पुरस्कार- 2010

3 ) कलाभूषण पुरस्कार- 2011

4)यशवंतराव चव्हाण कलारत्न पुरस्कार-2012

5 )राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श गुणवंत लोककला पुरस्कार-2012

6)विश्वशांती केंद्र आळंदी ,माईर्स शिक्षण संस्था पुणे भारत अस्मिता फाउंडेशन यांचा  राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड राज्यस्तरीय आध्यात्मरत्न गौरव” पुरस्कार 2013

6)संत भगवान बाबा कलारत्न पुरस्कार-2013

7)शिवशंभो राज्यस्तरीय पुरस्कार-2013

8)आत्मनिर्धार लोककला पुरस्कार-2015

9)छत्रपती कला गौरव पुरस्कार- 2015

10)राज्यस्तरीय सावित्रीज्योती कला गौरव पुरस्कार -2015

11)महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग इनका राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार-2016

12) राज्यस्तरीय शब्द गंध प्रबोधन कार्यगौरव पुरस्कार 2016

13)लोककला गौरव पुरस्कार 2017

14)ज्ञानसरीता कलारत्न पुरस्कार-2018

15)आदर्श कला समाज प्रबोधनकार पुरस्कार-2018

16) राज्यस्तरीय संत भगवान बाबा आध्यात्मरत्न गौरव पुरस्कार-2018 बीड- महाराष्ट्र

17) महाराष्ट्र राज्य जर्नालिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र यांचा राज्यस्तरीय दि प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श भारुड सम्राट पुरस्कार-2018

18) संत गाडगेबाबा विचार प्रबोधन पुरस्कार-2018

19)संत तुकडोजी महाराज कला गौरव पुरस्कार-2019

20) साई पावन प्रतिष्ठाण बेलापुर महाराष्ट्र यांचा साई कलारत्न गौरव पुरस्कार-2018

21) भरारी फाउंडेशन जळगाव महाराष्ट्र यांचा युवा भारुड विषेश सन्मान गौरव पुरस्कार-2020

22 ) पुणे महानगरपालिका यांचा  लोकशाहीर पठ्ठे  बापूराव लोककला पुरस्कार – 2020 असे 2500 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.


प्रश्न- भारुड म्हणजे काय ? या लोककले मधील तुमचा प्रवास थोडक्यात सांगा .

उत्तर – भारुड हे एक आध्यात्मिक  सादरीकरण करण्याची महाराष्ट्राची लोककला आहे.यामध्ये संतांच्या रचना सांप्रदायिक- आध्यात्मिक विचार हे गायन , अभिनय आणि नाटक स्वरूपात सादर केले जातात. त्याला भक्ती नाट्य सुद्धा म्हटले जाते.वयाच्या १२ व्या वर्षापासून हिंदू संत साहित्य आणि अध्यात्म भक्तिसंप्रदाय यांच्या प्रेम आणि सामाजिक जनजागृती चे काम करत आहे . ही कला मी मुस्लीम समाजात जन्मलो असलो तरीही सादर करत आहे.आज पर्यंत  ३५०० पेक्षा जास्त भारुडाचे कार्यक्रम आम्ही  आमच्या कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर घेतले आहेत.

 

प्रश्न- तुम्ही सादर करत असलेल्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगा ?

उत्तर –मी आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या उत्सवात गणेश उत्सव , नवरात्र उत्सव , कीर्तन महोत्सव , लोककला कार्यक्रम आणि जत्रा – यात्रा अशा अनेक कार्यक्रमांमधून मी माझी  भारुड कला लोकांसमोर मांडत आलो आहे . अजूनही  मांडत आहे.आकाशवाणी आणि दुरदर्शन चा मान्यताप्राप्त लोकसंगीत भारुड या विषयांमध्ये मी 2007 पासून बी- हाय ग्रेडचा कलाकार  आहे.

माझे मुंबई दूरदर्शन पुणे , अहमदनगर आकाशवाणी यांच्या माध्यमातून  आज पर्यंत संतांचे विचार त्यांच्या रचना भारुड आणि इतर सामाजिक विषयावरील भारुड प्रसारित झाले आहेत. ही कला सादर करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. दूरदर्शन मुंबई यांच्या सह्याद्री वाहिनीवरील धिना धिन धा , लोक उत्सव ,  कलारंग , भारत निर्माण , कीर्तनाच्या रंगी , लोक भजन , माझी माय अशा टीव्ही आणि रीअँलिटी शो मधून संतांची भारुड रचना सादर केली आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मी समाज जनजागृतीचे काम करत आहे.


प्रश्न –आज पर्यंत आपण कोण कोणत्या कार्यक्रमात सहभाग घेतला. ?

उत्तर- राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम व सहभाग

1) पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि रंगपीठ थिएटर मुंबई आयोजित भारुड महोत्सव मध्ये 2011 ते 2014 पर्यंत भारुड सादर केले आहे.

२) आंतरराष्ट्रीय साक्षरता साक्षरता दिनाच्या कार्यक्रमांमध्ये 2005 साली यवतमाळ आणि नांदेड मध्ये भारुड सादर केले.

3 ) माईर्स एम आय टी आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने आयोजित जागतिक सहिष्णुता सप्ताह मध्ये भारुड प्रस्तुती.

राज्यस्तरावरील सादर केलेले कार्यक्रम व सहभाग

१) पु. ल.  देशपांडे लोककला अकादमी मुंबई लोककला महोत्सव मध्ये सहभाग

२) वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनामध्ये प्रस्तुती.

३) संस्कार भारती देवगिरी प्रांत आयोजित राज्यस्तरीय बाल महोत्सव 2015 नांदेड.

४)सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय संस्कृतिक लोककला महोत्सव मार्च 2015 पुणे सांगली सातारा.

५)पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन अहमदनगर आयोजित सांस्कृतिक लोककला महोत्सव २०११.

६) महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग यांच्या वतीने 1 ऑक्टोंबर 2001 मध्ये पाणलोट सप्ताह पाणलोट विकासातून ग्रामीण विकास या विषयावर लोककलेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम.

७) कृषी विभाग महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र कृषी उत्पादकता अभियान यांच्या वतीने आयोजित फिरते कृषि प्रदर्शन कार्यक्रमात या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती (२००५/६).

८) फेब्रुवारी 2014 मध्ये नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील वसंत कृषी महोत्सव.

९) ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासन विभागीय सक्षम महिला महोत्सव आणि साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा 2012 ते 2017 मध्ये महिला सक्षमीकरण या विषयावर भारुड सादरीकरण.

१०) सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित महोत्सव जळगाव महाराष्ट्र.

११) महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई आणि भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव या कार्यक्रमांमध्ये महिला सक्षमीकरण आणि इतर विषयावर जनजागृती.

१२) साईबाबा जन्मशताब्दी महोत्सव 2018 साईबाबा मंदिर शिर्डी येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता आणि भक्ती परंपरा या विषयावर भारुड सादरीकरण.

१३) मुंबई विश्वविद्यालय आणि लोककला अकादमी मुंबई येथील विद्यार्थ्यांना भारुड प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण (२६ आणि २७ नोव्हेंबर २०१५).

१४) संसदीय राजभाषा समिती यांच्या दुसऱ्या उपसमितीच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी आकाशवाणी अहमदनगर यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम शिर्डी.

१५) जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय जलसाक्षरता परिषद आणि विशेष ग्रामसभा आदर्श गाव हिवरे बाजार महाराष्ट्र येथे जलसाक्षरता या विषयावर जनजागृती पर भारुड व अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई आयोजित लोककला महोत्सव – 2010.


प्रश्न – लोककला जोपासण्यासाठी सरकार किंवा समाज सेवी संस्थांकडून प्रयत्न होताना दिसतात का ? किंवा त्यांच्या कडून तुम्हाला लोक कलावंत म्हणुन काय अपेक्षा आहेत ?

उत्तर – सरकार भारुड प्रशिक्षण घेत पण त्याचा उपयोग ग्रामीण भागातील लोकांना होत नाही.  नुसतं पुणे, मुंबई तील लोकांना होतो . अनेक समाजसेवी संस्थेच्या वतीने माझे कार्यक्रम आयोजित केले जातात.  शासनाने युवा प्रतिभावंत कलाकारांना लोककला जतन संवर्धनासाठी मदत करावी. प्रतिभावंत युवालोक कलावंतांना शासनाने पुरस्काराने सन्मानित करून मानधन चालू करावे. आजही ग्रामीण भागातील लोक  कलावंत उपेक्षित आहे त्याला राजाश्रय मिळावा.


प्रश्न – कोरोना आणि लॉक डाऊन चा लोककलावंताच्या जीवनावर काय परिमाण झाला ?

उत्तर – खूप मोठा परिणाम झाला.  कोरोना  मुळे कार्यक्रम रद्द झाले. यात्रा,उत्सव, सप्ताह मध्ये कार्यक्रम असतात आणि ते यावर्षी सर्व बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली . अनेकांना मजुरी करून पोट भराव लागलं . काही स्वयंसेवी संस्थांनी थोडीफार मदत केली . मात्र शासनाने कुठल्याही प्रकारे  मदत केली नाही , आजही तीच परिस्थिती कायम आहे.

                                                   


प्रश्न-लोककला संवर्धनासाठी तरुण पिढीला काय संदेश द्याल ?

उत्तर- लोककला ही आपली सांस्कृतीक परंपरा आहे . तीचे  जतन , संवर्धन आणि सादरीकरण पुढील पिढीला  होण गरजेचं आहे . त्यामुळे तरुण पिढीनं ही कला आत्मसात करून त्या माध्यमातून समाज जागृती करावी .विविध सामाजिक विषयावर या माध्यमातुन भाष्य करावं जेणेकरुन व्यसनमुक्ती  ,पर्यावरण, स्वच्छता , बेटी बचाओ, अशा सामाजिक विषयावर प्रबोधन होईल . स्वयं रोजगाराच्या अनेक योजना याची माहिती तरुणांना होऊन सक्षम भारतीय नागरिक तयार होतील आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल.


मुलाखतकार – मा.अब्दुल शेख ( पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत )

 राष्ट्रीय भारुडसम्राट हमीद अमिन सय्यद हे भारूडकार असून त्यांचे अनेक कार्यक्रम टीव्ही ,रेडियो च्या माध्यमातून प्रकाशित आणि प्रसिद्ध झाले आहेत.


टीप- मुलाखतीत व्यक्त केलेल्या मताशी संपादक व प्रकाशक मंडळ सहमत असतील असे नव्हे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *