Headlines

श्री शिवाजी विद्यालयाचा 98.36 टक्के निकाल

कारी/आसिफ मुलाणी – कारी येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालयाचा  इयत्ता10  विचा 98.36टक्के निकाल लागला . यामध्ये करळे पायल पद्माकर (90.60),कावळे राजनंदिनी अनिल (90),तर गादेकर सुमित सुधाकर (85.20)यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.

या विद्यालयातील 61 विद्यार्थी परीक्षेला बसले होते , यामधील 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये विशेष प्राविन्यात 18 तर प्रथम श्रेणीत 30 विद्यार्थी आहेत. मागील वर्षांच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी चांगल्याप्रकारे विद्यालयाच्या निकालात मोठी वाढ झाल्याने पालक व गावकऱ्यांकडून शिक्षकांचे व विद्यालयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस एम भुसारे,ढेंबंरे ,संकपाळ, सोनवणे, शेख ,आगलावे, गायकवाड,या शिक्षकांचे  मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे, सचिव डॉ अनिल बारबोले, मुख्यध्यापक महावीर भुसारे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *