श्री शिवाजी तरुण मंडळ मळेगाव यांचा गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय , मात्र सामाजिक उपक्रम राबविणार

बार्शी – मळेगाव ता.बार्शी येथील श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ हे गेल्या 21 वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत होते. परंतु या वर्षी देशावर व राज्यावर कोरोना या महामारीचे संकटा उभे आहे,राज्य सरकारने गणेश उत्सव आगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मळेगाव येथे पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीरजी तोरडमल साहेब यांनी भेट दिली. श्री शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन गणेश उत्सव साजरा न करण्याची विनंती केली, व त्या विनंतीला मान देऊन श्री शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी साजरा केला जाणारा गणेश उत्सव न करण्याचा निर्णय घेण्यात आला,परंतु श्री शिवाजो तरुण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांनी दिली .यावेळी सरपंच गुणवंत मुंढे,पांगरी पोलीस स्टेशन चे अर्जुन कापसे,पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी,सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी , मंडळाचे कल्याण माळी, गणेश गाभने,ग्रामपंचायत चे क्लार्क सुरेश कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply