श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रक्तदान शिबिर व प्रत्येक रक्तदात्यास भारतीय संस्कृती प्रमाणे कपडे देऊन सन्मानित

सोलापूर/शाम आडम   :-  श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने २६ ऑगस्ट  रोजी क्रांती चौक कॉ गोदुताई विडी घरकुल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.  यात १२१ रक्तदाते रक्तदान करण्यात आले होते या प्रत्येक रक्तदात्यास सोमवारी  प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भारतीय संस्कृती प्रमाणे कपडे देऊन सन्मानित करण्यात आले करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे कॉ आडम मास्तर व वळसंगचे पोलिस निरीक्षक शिरिश मानगावे  यांनी कोविड – १९ च्या महामारी मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करणे हे कौतुकास्पद आहे , असे शिबीर इतर मंडळांनी देखिल राबविण्यात यावे असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  बाळकृष्ण चरण मल्याळ यांनी केले.
  हे शिबीर यशस्वी करण्यासाठी  मंडळाचे विनायक भैरी, महेश जक्कुल, संतोष बोडा, नागेश बंडी, नागेश कासुल,पवन गुंडेटी,मुकेश वल्लाल,राजेशम बुटला, श्रीनिवास दुबाशी,चंदन लोमटे,आनंद कटकम,दिपक भुदत्त,सतिश गुर्रम,राजु गुर्रम,राम चक्राल, संतोष अनमनलु, दिनेश लोमटे,पुरूषोत्तम कोंडी,अमोल म्हंता, केदारी राचर्ला, सतिश रापोल आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर करीता सिध्देश्वर ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले.

Leave a Reply