Breaking News

श्रमिक विरोधी धोरण रद्द करा , भारत बचाओ म्हणत कामगार संघटनाचा एल्गार

बार्शी / प्रतिनीधी – आयटक कामगार केंद्र, बांधकाम कामगार संघटना, आखील भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल  इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन च्या संयुक्त वतीने सोमवार रोजी श्रमिकांच्या विरोधात चालू असलेल्या धोरणांच्या विरोधात कामगारांच्या मागण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांचा देशव्यापी भारत छोडो दिन, क्रांती दिन हा भारत बचाओ दिन, म्हणून आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री, मा. कामगारमंत्री, मा. उच्च शिक्षण मंत्री यांना मा. तहसिलदार  यांचे व्दारा कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने निवेदन देण्यात आले.  तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची समाजकंटकांकडुन विटंबना केली गेली याचा तिव्र निषेध करण्यात आला व समाजकंटकांना कडक शासन करावे अशी मागणी शासनाकडे लेखी स्वरूपात करण्यात आली. 
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत  , बार्शीत कामगार अधिकारी द्यावा , बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी बंद करून ऑफलाईन नेांदणी सुरू करा, बांधकामगारांना 10 हाजरांची मदत द्या, मुलीच्या लग्नाला 51 हजार द्या, बांधकामा कामाचे साहित्य द्या, इ.एस.आय. लागू करा, प्रत्येक भारतीय नागरिकांना दरमहा 7500 रु आर्थिक मदत केंद्र सरकारने द्यावी. कोरोना मुळे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत, प्रत्येकाला 10 किलो धान्य, डाळ, जीवनावश्यक वस्तू  पुरवा, मोफत दरमहा मानसी करा,  रेल्वे खाजगीकरण चा निषेध करण्यात आला,  मनरेगा मजुरा  ला 500 रु किमान वेतन व प्रत्येकी 200 दिवस काम द्या, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक ना शासकीय कर्मचारी दर्जा द्या, राज्य सरकारी, जीप कर्मचारी ना जुनी पेन्शन लागू करा,  शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमुक्त करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लॉकडाऊन काळातील कामगार ना संपुर्ण वेतन द्या, एल आय चे खाजगी करण रोखा, कोरोना रुग्ण वरती मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून घ्या, आरोग्य वरचा खर्च वाढवा, वीज बिल कोरोना  काळातील माफ करा, मोलकरीण, यत्रमाग कामगार, रिक्षा चालक, सलून वेवसायिक, शेतमजूर साठी सामाजिक सुरक्षा देणारे मंडळ स्थापन करा, ईपीएस 95 पेन्शनर्स ला किमान 9 हजार रुपये पेंशन महागाई भत्ता सह लागू करा, कंत्राटी पद्धत रद्द करा, कंत्राटी कामगार, कर्मचारी ना त्वरित कायम करा, किमान वेतन 21 हजार रुपये द्या, आदिवासी कसत असलेल्या वन जमिनी नावावर करा,  कामगार कायदा ची अंमलबजावणी करा, कोरोना काळात रोजगार गेलेले पत्रकार, माध्यम कर्मी, कामगार, कर्मचारी ना स्वतंत्र मदतीचे प्याकेज जाहीर करा, बांधकाम कामगार ना मंडळ कडून त्वरित 10 हजार रुपये द्या, षिक्षणाचे खाजगीकरण, ऑनलाईन शिक्षण बंद करून, कोरोना काळातील परिक्षा फी, स्काॅलरशिप तातडीने द्या, राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतरांना आष्वासीत प्रगती योजना व सातव्या आयोगचा लाभ द्या व त्यांना पाच दिवसांचा आठवडा करा या मागण्या करण्यात आल्या आहेत. 
मा. नायब तहसिलदार मुंढे यांना निवेदन देण्यात आले. यावेळीकॉम्रेड  प्रविण मस्तुद, कॉम्रेड अनिरूध्द नकाते, कॉम्रेड  शाफीन बागवान, कॉम्रेड  बालाजी शितोळे,  संतोश मोहिते,  भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण, नवाज मुलाणी, शुभम शितोळे हे उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!