AgricultureBreaking Newssolapur

शेळी आणि दुधाळ जनावरांच्या वाटप योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर,दि.5: जिल्हा परिषद सोलापूरच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षामध्ये विविध योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी 4 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी केले आहे.

        विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती/ नवबौद्ध लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर 10+1 शेळी गट वाटप करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे आणि शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 100 एकदिवसीय सुधारित जातीचे कुक्कुट पिल्ले वाटप या योजना राबविण्यात येत आहेत.

        या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज 5 जुलै 2021 पासून पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती सर्व/ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर www.zpsolapur उपलब्ध आहेत. विहित नमुन्यातील अर्ज 4 ऑगस्ट 2021 पर्यंत सादर करावेत.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!