Breaking News

शेतकरी संघर्ष संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांची निवड

हुलजंती/अमीर आत्ताऱ  : शेतकरी संघर्ष संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी हुलजंती गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले व पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष जनार्धन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.या निवडी बद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 
लवकरच पश्चिम महाराष्ट्र कारकरणीचा विस्तार करण्यात येणार आहे, तरी जे कोणी या सामाजिक संघटनेत सहभागी होऊन सामाजिक कार्य करू इच्छितात त्यांनी माझ्याशी अथवा  पश्चिम महाराष्ट्र संघटक अमीर अतार यांच्याशी संपर्क साधा असे नव नियुक्त पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते (वडियार) यांनी सांगितले आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!