Headlines

शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्येकारी अध्यक्ष पदि श्री नानासाहेब बच्छाव यांची निवड

[ संघर्षमय नेतृत्व, अनेक सामाजिक संस्थेमाध्यमातुन समाजसेवा ते शेतकरी संघर्ष संघटनेच्या सर्वोच्च जबाबदारीचा हा संघर्षमय नानासाहेब बच्छाव यांचा जीवनप्रवास…]

शेतकरी चळवळीतील झुंजारवादि परिवर्तनाचे संघर्षमय वादळ म्हणजेच श्री नानासाहेब बच्छाव जनतेसाठी जगाव दुसऱ्यांसाठी झिजाव, अन्यायाविरुद्ध लढाव हेच नानासाहेबांकडून शिकाव.असे निर्भिडपणे शेतकरी लढ्यात योगदान देणारे श्री नानासाहेब बच्छाव यांची शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष मा. श्री हंसराज वडघुले पाटिल यांनी शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्येकारी अध्यक्ष पदि निवड केली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपञ ही देण्यात आले आहे. शेतकरी संघर्ष संघटनेची सर्वोच्च मोठी जबाबदारी श्री नानासाहेब बच्छाव यांचेकडे दिलेली आसुन सर्व संघटनात्मक बांधनीसह सर्व नियोजनाचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहेत.

कृतिशिल शेतकरी चळवळीतील झुंजारवादी उल्लेखनीय नेतृत्व….

शेतकरी कुटुंबातील नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे गावचे भुमिपुञ श्री नानासाहेब बच्छाव शेतकऱ्यांचे हक्कासाठी चा लढा सुरवातीपासुन लढत आहेत. मनात नेहमी गोरगरीबांचे कल्याणाची आस, अन्याय अत्याचाराविरोधात चीड, शेतकऱ्यांबद्दलची आपुलकी म्हणून ते आपल काम बाजुला ठेवत आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेटि देवून मदतीचा हात देत आहेत, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नेते माजी आमदार मा.पुंजाबाबा गोवर्धने यांच्या विचारांर प्रभावित होऊन नंतर शेतकरी वाचवा अभियान जिल्ह्यात त्यांनी जोमान सुरु केले, या कामी मीही अनेक सहकार्यांसह नानासाहेबांचे सोबतीला होतो..

नानासाहेब बच्छाव यांनी शेतकरी वाचवा अभियान सर्वांचे सोबतीन गावागावात पोहचवून समविचारी वैचारिक तरुण लोक संघटित केली, शेतकऱ्यांना प्रबोधन ते समुपदेशन यासाठी गावागावात दौरे केले. मग प्रश्न कोणताही तीथल्या अडचण सोडवल्या.

शेतकरी संपातील किसान क्रांती, सुकाणु समिती त्यांत महत्त्वपुर्ण योगदान, स्वाभिमानीचे व्यापक दुध आंदोलनात सेट्रल जेलची सजा, ईतरही लढ्यात, आंदोलना वेळी अनेकदा गुन्हे आरोप पण तरीही सातत्याने मार्गक्रमन करत नानासाहेबांचे अखंड काम चालूच ठेवले..

धाडसी, निर्भिड व हजर जबाबी सडेतोड व्यक्तीमत्व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ यामुळेच महाराष्ट्रभर सम विचारांचा मैञीचा गोतावळा निर्माण केला आहे. नानासाहेबांचे वैचारिक विचार थोर पुरुषांचे विचाराशी साम्यता साधणारे आहेत, याचा नेहमी अभिमान वाटतो. याचा प्रत्यय अनेकदा आलेल्या संकटावेळी आम्ही अनुभवला आहे.

शेतकरी चळवळीतील अविरत निस्वार्थ कार्याचा विचार करता योग्य व्यक्ती योग्य निवड आशीच त्यांची निवड असुन त्यांचे कार्यालाही गौरवांन्वित करणारी आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारे नानासाहेब बच्छाव यांना भावी वाटचालीला खुप-खुप हार्दिक शुभेच्छा…

अमीर आत्तार

Leave a Reply