Headlines

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा – अखिल भारतीय किसान सभेची वाशी तहसिल वर निदर्शने

वाशी/विशेष प्रतींनिधी  –  केंद्रातील भाजपा सरकार ने केलेले शेतीविषयक तिन्ही कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे त्यामुळे ते रद्द करावेत तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलना वरील दडपशाही बंद करा या मागणी मागण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज वाशी तहसिल वर निदर्शने करण्यात आले.

 सविस्तर वृत्त असे की केंद्रातील भाजपा सरकार ने केलेले १) शेतीमाल विक्री कायदा २०,२)कंत्राटी शेती कायदा२०,३)अत्यावश्यक वस्तू कायदा२० हे तीनही कायदे हे शेतकरी विरोधी आहेत हे रद्द करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता दिल्लीत पोहचले आहे पंजाब हरियाणा उत्तरप्रदेश मधील शेतकरी या आंदोलनात राजधानीला घेराव घालून बसले आहे या शेतकरी आंदोलकांवर केंद्र सरकार अमानुष अत्याचार करत आहे , शेतकऱ्यांवर कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत, लाठीमार करण्यात येत आहे, त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे नोंदवले आहेत . या सर्व अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने आज वाशी तहसिल कार्यालयावर तीव्र निदर्शने करत केंद्र सरकार चा निषेध नोंदवला यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड पंकज चव्हाण, धनंजय गोंदवले ,उल्हास लाखे, अशोक माने , शुभम तातुडे स्वाभिमानीचे अनंत डोके,  समाधान,चव्हाण,ज्ञानेश्वर क्षीरसागर,मयुर राऊत ,बाळासाहेब हुंबे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *