शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्रचालक पुढे सरसावले

उस्मानाबाद – मागील तीन महिन्यांपासून पासून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिवार संसद संचलित शिवार हेल्पलाइन सुरू झालेली आहे.हेल्पलाइन नंबर गावागावात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी टीम काम करत आहे.  कोरोनामुळे अडचणीही येत आहेत पण या अडचणीवर मात करत हे वेगवेगळे मार्ग काढून हेल्पलाइन नंबर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे.  यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राचे सहकार्य ही लाभत आहे. जिल्हा समन्वयक अशोक कदम विविध कृषी सेवा केंद्रावर जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत व त्यांना कामाचा उद्देश व स्वरुप सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या हेल्पलाइन नंबर वर कळवायला सांगून, गरजू शेतकऱ्यांपर्यंत हेल्पलाइन नंबर पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ते करत आहेत. कृषी सेवा केंद्राच्या व्हाट्सअप ग्रुप ला जोडून घेणे व त्यांनाही शिवार च्या ग्रुपला जोडून घेणे असे चालू आहे. दरम्यान सारोळा (बु), चिखली, समुद्रवाणी, कनगरा, बेंबळी, रुईभर, देवळाली, आंबेजवळगा, वरुडा, पाडोळी (आ) तसेच तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, दिंडेगाव, इटकळ, येथे भेटी देऊन झाल्या आहेत. कृषी सेवा केंद्राचे संचालक आम्ही तुम्हाला या सामाजिक कामासाठी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन देत आहेत.
जिल्ह्यातील इतर गरजू शेतकऱ्यांनी हेल्पलाइनवर ८९५५७७१११५ संपर्क करावा असे आवाहन शिवार हेल्पलाइन कडून करण्यात आले.हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी  मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, परिवर्तन ट्रस्ट,तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.अशी महिती जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *