Headlines

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी कुर्डूवाडी रोडवरील बायपास चौकात रस्ता रोको करणार

अखिल भारतीय किसान सभा दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी कुर्डूवाडी रोडवरील बायपास चौकात रस्ता रोको करणार 

बार्शी-/अब्दुल शेख – केंद्र सरकार ने पारित केलेले शेतीमाल विक्री कायदा २०२०, शेती कायदा२०२०, वस्तू कायदा २०20 हे तीनही कायदे हे शेतकरी विरोधी आहेत ते रद्द करावेत ही मुख्य मागणी घेऊन त्यासोबतच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मा. तहसीलदार बार्शी यांना दिनांक 5 डिसेेंबर 2020 रोजी रस्ता रोको करणार असल्याचे  निवेदन देण्यात आले.

अधिक माहिती अशी की, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता दिल्लीत पोहचले आहे पंजाब हरियाणा उत्तरप्रदेश मधील शेतकरी या आंदोलनात राजधानीला घेराव घालून बसले आहे या शेतकरी आंदोलकांवर केंद्र सरकार अमानुष अत्याचार करत आहे, याला विरोध करण्यासाठी त्यासोबतच शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावेत, बार्शी मधील ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई तातडीने मिळावी, 2018 चा दुष्काळ निधी मिळावा, 2020 चा खरीप विमा मेळावा या मागण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर 2020 वार शनिवार रोजी बार्शी कुर्डवाडी रस्त्यावरील बायपास चौकात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रास्तारोको करण्यात येणार असल्याचे निवेदन माननीय तहसीलदार यांचे प्रतिनिधी कडगांची वीरेश यांनी स्विकारले.

हे निवेदन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी कॉ.लक्ष्मण घाडगे, कॉ. दत्तात्रय जगदाळे, कॉ. भारत भोसले, कॉ. धनाजी पवार, कॉ. प्रवीण मस्तूद, कॉ.अनिरुद्ध नकाते, जयवंत अांबिले, कॉ. शाफीन बागवान, कॉ. पवन आहिरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *