Headlines

शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटीवर भरण्याची प्रक्रिया सुरु


सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, विद्यावेतनासाठी नवीन व नुतनीकरणासाठीचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर भरण्याची सुविधा 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे.

महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ , व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, तांत्रिक यासर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून नवीन व नुतनीकरणाचे अर्ज त्वरीत भरुन घ्यावेत. ऑनलाईन भरलेले अर्ज मंजुरीसाठी सहायक आयुक्त सामाजिक न्याय कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

योजनेच्या लाभापासून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची खबरदारी महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन श्री.आढे यांनी केले आहे.

Leave a Reply